Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

उपचार घेण्यास नकार उपोषणाचा चौथा दिवस

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी तीव्र केला असून, त्यांनी त्यासाठी 8 जूनपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली. मंगळवारी उपोषण

धनगर आरक्षण लढा तीव्र करा मी ताकदीने पाठीशी.:- मनोज जरांगे  
आरक्षणप्रश्‍नी महाराष्ट्र पिंजून काढणार ः मनोज जरांगे
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी तीव्र केला असून, त्यांनी त्यासाठी 8 जूनपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली. मंगळवारी उपोषणाचा दिवस असून, यादिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
राज्य सरकारने सगे-सोयर्‍याची अंमलबजावणी केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. तसेच सगे सोयरे कायद्यासह इतर मागण्या तातडीने मंजूर कराव्या अशी मागणी पाटील यांनी केली आहे. जशी लोकसभेला फजिती झाली तशी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत देखील करून सगळ्यांचे उमेदवार पाडू असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारचे कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले नाही.  मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभारला. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे यांची असून ते यावर ठाम आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला काही ग्रामस्थांनी विरोध केला होता. दरम्यान, त्यांना उपोषण करण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली होती. मात्र, जरांगे यांनी पुन्हा 8 जून पासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस असून गेले चार दिवस त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली आहे.

8 जूनपासून उपोषणाला सुरुवात – मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे. मनोज जरांगे लोकसभा निवडणूक निकाल लागल्यावर 4 जून पासून उपोषण सुरू करणार होते. मात्र, आचारसंहिता असल्याने त्यांनी त्यांचे उपोषण हे 8 जून पासून सूर करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्यांच्या उपोषणाला गावातील काही जणांचा विरोध होता. त्यांच्या गावाच्या आजूबाजूच्या काही गावांनी देखील जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला होता. मात्र, त्यांनी या विरोधाला न जुमानता 8 जूनपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे.

COMMENTS