अहमदनगर/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महा कृषीऊर्जा अभियान योजनेचा लाभ घेत अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहे
अहमदनगर/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महा कृषीऊर्जा अभियान योजनेचा लाभ घेत अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकर्यांकडे 38 कोटी 24 लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी 5 कोटी 82 लाख रुपये चालू वीजबिल व 50 टक्के थकबाकीचे 19 कोटी 12 लाखांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित 50 टक्के थकबाकीचे 19 कोटी 12 लाख रुपये त्यांना माफ करण्यात आले आहेत.
कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 4 लाख शेतकर्यांच्या मूळ थकबाकीमधील 1649 कोटी 83 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकर्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी 1689 कोटी 21 लाख रुपयांची माफी त्यांना मिळणार आहे. महाकृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख 95 हजार 868 शेतकर्यांकडे 5 हजार 30 कोटी 82 लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील 1649 कोटी 83 लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे 2 कोटी 57 लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकर्यांकडे 3378.42 कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च 2022 पर्यंत त्यातील 50 टक्के म्हणजे 1689 कोटी 21 लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित 1689 कोटी 21 लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत. आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 515 शेतकर्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी 77 कोटी 43 लाखांचे चालू वीजबिल व 45 कोटी 31 लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकर्यांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि 50 टक्के थकबाकी माफीचे रुपये माफ करण्यात आले आहेत.
…तर, वीजपुरवठा तोडणार
वीजग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे व दुसरीकडे महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक झाले आहे. चालू वीजबिलांचा भरणाही करणार नाही अशा कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी वीजबिल थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. तसेच वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग न घेणार्या व चालू वीजबिलांचाही भरणा न करणार्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होेणार आहे. महावितरणवरील आर्थिक संकट गंभीर असल्यामुळे शेतकर्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS