Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांसह 9 आमदार होणार बडतर्फ  

पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठवेत कारवाईचा प्रस्ताव मंजूर

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमधून बंड करून भाजपसोबत गेलेल्या आमदारांवर सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. शप

बोगस खते, बियाणे विकणार्‍यांवर कठोर कारवाई
माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभाग घ्यावा

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमधून बंड करून भाजपसोबत गेलेल्या आमदारांवर सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आल्यामुळे या आमदारांना पक्षातून बडतर्फ करण्यात येणार आहे.  
याबाबत अधिक माहिती अशी की, अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी फूट पडली आहे. कालच्या शपथविधीनंतर अजित पवार यांनी संपूर्ण पक्ष आमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र शरद पवार यांनी या सर्वांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे सांगत कारवाईला सुरूवात केली आहे. त्यानंतर आता पक्ष विरोधात जाऊन शपथ घेणार्‍या नऊ आमदारांविरोधात राष्ट्रवादीने कारवाई केली आहे. हा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अदिती तटकरे आणि धर्माराव बाबा अत्राम यांच्यावर ही कारवाई होणार आहे. तसेच या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व नेतेही पक्षाकडून बडतर्फ करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकार मध्ये सामील होणार्‍या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्यांना पक्षातून बडतर्फ करीत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या गटाच्या वेगळ्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीने कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रवादीने मोठी कारवाई करत शिवाजीराव गर्जे पक्षातून बडतर्फ केले आहे.  अजित पवारांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांसोबत शपथविधीला हजर राहणार्‍या आमदारांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने पहिली मोठी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार शिवजीराज गर्जे यांना पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याचे कारण देत सदस्यत्व आणि पक्षाच्या सरचिटणीस पदावरून बडतर्फ केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही पहिली कारवाई केली आहे. जयंत पाटील यांनी शिवजीराज गर्जे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणार्‍या व उपमुख्यमंत्री/ मंत्रिदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलात. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. आपली कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत आहे. ’तसेच पक्षाच्या सदस्यत्वावरुन व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी सूचना जयंत पाटील यांनी केली आहे.

COMMENTS