Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बार्शी फटाक्याच्या स्फोटाने हादरले 9 कामगारांचा मृत्यू, 3 महिला गंभीर जखमी

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

सोलापूर/प्रतिनिधी ः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत जिंदार कंपनीत स्फोट होऊन 9 जण गंभीर जखमी झाले असताना, दुसरीकडे सोलापूर

गप्पा मारत मैत्रिणी निघाल्या अन् भरधाव वेगाने एकीला कारने उडवलं | LOK News 24
राज्यात उष्णतेची लाट कायम
नागपूरात 24 तासामध्ये तिघांची हत्या

सोलापूर/प्रतिनिधी ः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत जिंदार कंपनीत स्फोट होऊन 9 जण गंभीर जखमी झाले असताना, दुसरीकडे सोलापूर जिल्हा देखील फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटाने हादरला आहे. बार्शी तालुक्यात शोभेची दारू तयार करणार्‍या कारखान्यात मोठा स्फोट होऊन 9 जण ठार तर जवळपास 25 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा कारखाना शिराळे-पांगरी हद्दीत आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास शिराळे पांगरीदरम्यान घडली.

हा स्फोट मणियार यांच्या फटाक्यांच्या कारखान्यात झाला. या भीषण आगीत कारखान्याची राखरांगोळी झाली. या घटनेत कारखान्यातील 9 कामगारांचा मृत्यू झाला असून, तीन महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर अनेक कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी परिसरात फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन 9 कामगार जळून खाक झाले. यात तीन महिला गंभीर जखमी आहेत.  घटनेनंतर बार्शी नगरपालिकेतील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य सुरू आहे. या स्फोटात 20 ते 25 जण भाजले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर कारखान्यातून आगीचेव धुराचे लोट बाहेर पडत असून बचावकार्यात अडचणी येत आहेत. अधूनमधून कारखान्यातील दारू गोळ्याचे छोटे-मोठे स्फोट होत आहेत. मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्रणा दीड तासानंतर आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका वेळेत दाखल न झाल्याने जीवित हानी झाली असे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. पावणे पाच वाजेपर्यंत बार्शी नगरपालिकेची फक्त एकच अग्निशमन यंत्रणेची गाडी होती. साधारण एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणून आग विझविण्यासाठी फेर्‍या मारत होती. पाच किलोमीटर अंतरावर पांगरी हे गाव असताना तब्बल दीड तास उशिराने अ‍ॅम्बुलन्स आली. त्यानंतर पावणे पाच वाजता पाच अ‍ॅम्बुलन्स आल्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बार्शी तालुक्यात ही दुर्घटना घडली.

स्फोटाचे 10 किलोमीटरपर्यंत हादरे – बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी परिसरात शोभेची दारू तयार करण्याचा कारखाना आहे. येथे फटाके, दारूगोळे तसेच आतषबाजीची दारू तयार केली जाते. आज ( 1 जानेवारी 2023) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ माजली. याची तीव्रता इतकी होती की, स्फोटाचा आवाज जवळपास 10 किलोमीटर परिघात ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले.

COMMENTS