Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यात अल्पवयीन मतिमंद मुलीवर 8 जणांचा बलात्कार; संशयित महिलेसह आठजण पोलीस कोठडीत

पाटण तालुक्यातील माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी ढेबेवाडी विभागातील रूवले येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. काही म

दुचाकी-ट्रक धडकेत युवक जागीच ठार; एक जखमी
शासकीय इमारतीच्या छताला लागली गळती; कर्जत पंचायत समितीच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी त्रस्त
वाजेगाव निंबळकमध्ये अवैध गुटखा जप्त

पाटण तालुक्यातील माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी ढेबेवाडी विभागातील रूवले येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. काही महिन्यानंतर झालेल्या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

पाटण / प्रतिनिधी : पाटण येथील एका महिलेने एक अल्पवयीन मुलीच्या मतिमंद पणाचा गैरफायदा घेत बाहेर फिरायला नेऊन खाऊ देण्याचे व पैसे देण्याचे आमिष दाखवून पाटण व परिसरातील लोकांची ओळख करून त्यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. संशयित आठजणांनी मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेमुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान, मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाटण व परिसरातील नऊजणांना याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना कराड कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवस तर महिलेस 4 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याबाबत पाटण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटण येथे राहणार्‍या एका महिलेने दि. 27 जानेवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान महिलेने तिच्या परिचयाच्या एका अल्पवयीन व मतिमंद मुलीला बाहेर फिरायला नेऊन खाऊ देण्याचे तसेच पैशाचे आमिष दाखवले. पाटण व परिसरातील लोकांशी ओळख करून दिली त्यांच्याशी अल्पवयीन मुलीला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. सर्व संशयितांपैकी आठजणांनी या मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे. या घटनेची तक्रार मुलीच्या आईने पाटण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पाटण पोलिसांनी संशयित आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन बारा तासात अटक केली. त्यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. सोमवारी संशयितांना कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता संशयितांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकार्‍याकडे वर्ग करण्यात आला आहे.

COMMENTS