विटा / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होत असलेल्या 45 गावांपैकी गार्डी, गोरेवाडी, ढवळेश्वर, घोटी खुर्द, मादळमुठी, धोंडेवाडी, धो
विटा / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होत असलेल्या 45 गावांपैकी गार्डी, गोरेवाडी, ढवळेश्वर, घोटी खुर्द, मादळमुठी, धोंडेवाडी, धोंडगेवाडी आणि वासुंबे गावांची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. रेवणगाव येथे सरपंचपदासाठी फक्त लढत होत असून उर्वरित सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत.
खानापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 199 तर सदस्य पदासाठी 972 असे 1 हजार 171 अर्ज दाखल झाले होते. सरपंच पदासाठी दाखल झालेल्या 199 अर्जापैकी 197 अर्ज वैध तर 2 अर्ज अवैध ठरले. सदस्यांसाठी 972 अर्जांपैकी 962 वैध तर 10 अर्ज अवैध ठरले. तालुक्यातील वासुंबे, मादळमुठी, धोंडेवाडी, धोंडगेवाडी ही गावे बिनविरोध झाली होती. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गार्डी, गोरेवाडी, ढवळेश्वर, घोटी खुर्द ही 4 गावे बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच रेवणगाव येथे सरपंचपदासाठी लढत होत आहे.
अर्ज माघारीच्या दिवशी नेते मंडळींची पळापळ दिसून आली. अर्ज दाखल करणार्यांपेक्षा उमेदवारांपेक्षा इतर कार्यकर्त्यांची प्रशासकीय इमारतीत मोठी गर्दी दिसून आली. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असल्याने बहुतांश ठिकाणी बिनविरोधचा फार्म्युला फेल गेल्याचे दिसले. त्यामुळे सदस्य पदासाठीही सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांनी ही सीट माझ्या संग असू दे ‘असा आग्रह नेते मंडळींच्या समोर धरताना दिसत होती. रेवणगाव येथे उर्वरित सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता 45 पैकी 37 ग्रामपंचायतीसाठी यावेळी निवडणूक होणार असे निश्चित झाले आहे.
COMMENTS