Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदुकाका सराफाच्या दुकानात 79 लाखाचा अपहार

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील प्रसिध्द सराफी व्यावसायीक चंदु काका सराफ अ‍ॅण्ड सन्स दुकानातील तब्बल एक किलो 246 ग्रॅम वजनाचे 79 लाख 38 हजार 420 रूपया

वादळामुळे सोलर पॅनल भुईसपाट ; शेतकरी चिंतेत
मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या 355 औषधाच्या बाटल्या केल्या जप्त | LOKNews24
यमुना नदीत बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील प्रसिध्द सराफी व्यावसायीक चंदु काका सराफ अ‍ॅण्ड सन्स दुकानातील तब्बल एक किलो 246 ग्रॅम वजनाचे 79 लाख 38 हजार 420 रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी महिला कर्मचार्‍यांसह दोघांना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कर्मचार्‍यांनी संबंधित सोन्याचा अपहार करून त्या सोन्यावर एका सोने तारण कंपनीकडून 45 लाखांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. कोमल अनिल केदारी (वय -24, रा. नानापेठ,पुणे) आणि सागर सुर्यकांत नकाते (वय -32, रा. ससाणेनगर, हडपसर,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघां आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सागर आणि कोमल हे संबंधीत चंदुकाका सराफी दुकानात आवक -जावक विभागात नोकरीस होते. त्यांनी दुकानात नोकरी करताना संगणमत करून पैशाच्या हौस पायी दुकानातील एक एक दागिना गायब करत आत्तापर्यंत तब्बल 36 दागिने लंपास केले. मात्र, दुकानाच्या ऑडीटमध्ये संबधित एक दागिना प्रवासात असल्याचे ते भासवत होते. मात्र, नुकताच दुकानातील दागिन्यांची तपासणी करताना, एक दागिना नसल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर व्यवस्थापनाने सर्व दागिन्यांची तपासणी केली असता, एकूण 36 दागिने लंपास झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दुकानात सर्व कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी सागर आणि कोमल हे दोघे गडबडले त्यामुळे याबाबत सराफी दुकानाचे व्यवस्थापक ओंकार प्रताप तिवारी (29, रा. वृंदावन सोसायटी, चर्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आल्यावर, त्यांनी पैशासाठी हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्यांनी एक एक दागिन्यांचा अपहार केला. त्यावेळी अपहाराचा प्रकार लक्षात न येण्यासाठी त्यांनी दागिने प्रवासात असल्याचे भासवले. तब्बल एक किलो 246 ग्रॅम दागिन्यांचा अपहार करत वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून त्यांनी कर्ज काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर दोघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान घडला आहे.

COMMENTS