महाराष्ट्रात 90 दिवसांत 767 शेतकर्‍यांचा आत्महत्या

Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात 90 दिवसांत 767 शेतकर्‍यांचा आत्महत्या

काँगे्रस नेते राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा

मुंबई ः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीवरून गदारोळ सुरू असतांनाच गुरूवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सरका

कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून पाटण मतदार संघाला 5.29 कोटींचा निधी
श्याम बेनेगल : सामान्य प्रेक्षकांपर्यंत न पोहचलेले दिग्दर्शक !
शिवसेना २ खासदार लढवणार ; ते जिंकुन आणु ही आमची भूमिका l LOKNews24

मुंबई ः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीवरून गदारोळ सुरू असतांनाच गुरूवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर टीकेची झोड उठवतांना म्हटले आहे की, महाराष्ट्रात अवघ्या 90 दिवसांत 767 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सरकारला प्रश्‍न करत हा फक्त एक आकडा आहे का? असेही त्यांनी सरकारला उपहात्मक पद्धतीने विचारले आहे. यावेळी बोलतांना काँगे्रस नेते खा. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. हा फक्त एक आकडा आहे का? नाही. ही 767 उद्ध्वस्त घरे आहेत.

767 कुटुंबे कधीही सावरू शकणार नाहीत आणि सरकार गप्प आहे. ते दुर्लक्षितपणे पाहत आहे. शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे, खते आणि डिझेल महाग आहेत पण सरकारी एमएसपीची हमी नाही. जोपर्यंत शेतकरी कर्जमाफीची मागणी करत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. उद्योजकांच्या कर्ज माफीवरून राहुल गांधींनी सरकारवरही निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले की, अनिल अंबानींचा 48 हजार कोटी रुपयांचा एसबीआय घोटाळा, पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबद्दल बोलले होते पण आज परिस्थिती अशी आहे की अन्नदात्याचे आयुष्य अर्धे होत चालले आहे. ही व्यवस्था शांतपणे शेतकर्‍यांना मारत आहे. पण मोदीजी स्वतःच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटूनही सरकारला हे आश्‍वासन पूर्ण करता आलेले नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

COMMENTS