Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 72 उमेदवार रिंगणात

201 उमेदवारांनी घेतली माघार

जळगाव प्रतिनिधी - चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी

हिमायतनगरात तहेजीब फाउंडेशनच्यावतीने एकोणीस जोडपे विवाहबद्ध…
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर ?
कन्नड-उर्दु शाळांसाठी मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या नियुक्त्या

जळगाव प्रतिनिधी – चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. या निवडणुकीत 289 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. छाननी नंतर 273 नामनिर्देशन पत्र राहिले होते. आज उमेदवार अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख असल्याने सर्वच राजकीय पक्ष पॅनल साठी गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची मुलाखती घेऊन कोणासोबत युती आघाडी करायची यामध्ये लागलेले होते. आज दिवसभर पक्षीय नेत्यांच्या घरी बैठकांवर बैठका सुरू आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत 201 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले तर 18 जागांसाठी आता 72 उमेदवार रिंगणात आहेत. या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चार मतदारसंघांमध्ये हे 72 उमेदवार आहेत. 28 एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एफ. गायकवाड यांनी सांगितले. 

COMMENTS