Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूरमध्ये विचित्र अपघातानंतर 7 गाड्या जळून खाक

ट्रक, उसाचा ट्रॅक्टर आणि डिझेल टँकरचा अपघात

लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्ह्यात ट्रक, उसाचा ट्रॅक्टर आणि डिझेल टँकरचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर 7 वाहने जळून खाक झाली. या अपघातात एका ज

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात भीषण अपघात
नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

लातूर प्रतिनिधी – लातूर जिल्ह्यात ट्रक, उसाचा ट्रॅक्टर आणि डिझेल टँकरचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर 7 वाहने जळून खाक झाली. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातल्या भातखेडा गावाजवळ नांदेड महामार्गावर रात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला. डिझेल-पेट्रोल घेऊन जाणारा टँकर व उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. जवळून जात असताना टँकर आणि ट्रॅक्टरमध्ये घर्षण झाले त्यामुळे टँकरने अचानक पेट घेतला. त्यामुळे उसाचा ट्रॅक्टर भक्षस्थानी सापडला. यावेळी टँकर जवळून जाणारा इतर वाहनेही सापडली. या अपघातात टँकरसह लागलेल्या आगीत सात वाहने एक एस टी महामंडळाची बस, ट्रक, 2 कार, 2 ट्रॅक्टर हेड, तीन ट्रॅक्टर ट्रॉली अशी सात एकामागे एक असलेली वाहने जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या अपघातात टँकर चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला आह. तर इतर वाहनांचे साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS