संगमनेरात परराज्यातील 69 लाखांची दारू जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात परराज्यातील 69 लाखांची दारू जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी ः कापसाचे सूत असल्याचे भासवून गोवा राज्य निर्मित असलेेले लाखो रुपयांचे मद्य वाहतूक करणारा कंटेनर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागीय भ

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर बंद
नगर अर्बन बँकेत सभासदांचा राडा.. प्रशासकांना शिवीगाळ | ब्रेकिंग | LokNews24
Ahmednagar : सागर भांड टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः कापसाचे सूत असल्याचे भासवून गोवा राज्य निर्मित असलेेले लाखो रुपयांचे मद्य वाहतूक करणारा कंटेनर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात पकडला. यामध्ये 69 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला असून वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यनारायण रामचंद्र शिरसाट (वय 35, रा. सम्राट अशोक नगर, एस.सी.छागला रोड, सीपीडब्ल्यूडी ऑफिस जवळ विलेपार्ले (पुर्व) सहार पी अ‍ॅण्ड टी कॉलनी मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
गोवा राज्यात निर्मित असलेले मद्य मोठ्या प्रमाणावर कंटेनरमधून संगमनेरच्या दिशेने येणार असल्याची माहिती पुणे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक उषा वर्मा, विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाच्या भरारी पथकाने 11 नोव्हेंबर रोजी वेल्हाळे शिवारात एक कंटेनर पकडला. या कंटेनरच्या चालकाकडे पथकातील अधिकार्‍यांनी चौकशी केली असता चालकाने कापसाचे सूत नेत असल्याचे सांगितले व त्याची अ‍ॅव्हीजी लॉजीस्टीक लि. (दिल्ली) या ट्रान्सपोर्ट कंपनीची बिल्टी व खजुरीया टेक्सटाईल मिल (नवी मुंबई) यांची इनवाईस कॉपी दाखविली. परंतु खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडीमध्ये मद्यच असल्याच्या संशयावरून अधिकार्‍यांनी या वाहनाच्या मागील बाजूस असलेले सील उघडून तपासणी केली. या वाहनाच्या हौद्यामध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीस परवानगी असलेले रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 38 हजार 352 सीलबंद बाटल्या (799 बॉक्स), किंग फिशर स्ट्राँग बिअर 500 मिली क्षमतेच्या 2304 सीलबंद बाटल्या (96 बॉक्स) यासह एक आयशर कंपनीचा 20.16 मॉडेलचा सहा चाकी कंटेनर (क्रमांक एम.एच. 04 एचडी 8892) व इतर साहित्य असा एकूण अंदाजे किंमत 69 लाख 13 हजार 300 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सूर्यनारायण रामचंद्र शिरसाठ याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ, ई, 81, 83, 90, 103 व 108 तसेच भारतीय दंड संहिता 420 चे कलम 1860, 465, 468 व 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, संजय बोधे, एस. एन. इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश सुळे, जवान स्टाफ प्रताप कदम, अमर कांबळे, अहमद शेख, भारत नेमाडे, शशांक झिंगळे, सतीष पोंधे, अनिल थोरात तसेच स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आर. डी. वाजे, ए. जे. यादव, एस. आर. वाघ, जवान विजय पाटोळे, सचिन गुंजाळ, तौसीफ शेख यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास पुणे विभागाचे दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड करत आहेत.

COMMENTS