Homeताज्या बातम्यादेश

लोकसभेसाठी 65 कोटी मतदारांनी केले मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचे 42 अहवाल आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे प्रत्येकी 14 अहवाल गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकड

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करा-सुरेश हात्ते
सत्यजित तांबेंची काँग्रेसमधून हकालपट्टी
या’ तीन जिल्ह्यात ओबीसींचे प्रमाण शून्य टक्के |

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचे 42 अहवाल आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे प्रत्येकी 14 अहवाल गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत तब्बल 64 कोटी 64 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. वेळी आयोगाने हे अहवाल जगभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, निवडणूक निरीक्षकांना उपयुक्त ठरतील, असे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. 1952 नंतर सर्वाधिक दिवस हा लोकशाहीचा उत्सव सुरू होता. यासंदर्भातील आकडेवारी आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीत 64 कोटी 64 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. इतर देशांच्या तुलनेत भारतातील लोकशाही अभूतपूर्व असल्याचेदेखील आयोगाचे निवडणुकांची आकडेवारी जाहीर करताना म्हटले आहे. 2024 मध्ये 12 हजार 459 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, तर 2019 मध्ये ही संख्या 11 हजार 692 होती. तर 2024 मध्ये 8360 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. तर 2019 मध्ये 8 हजार 054 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग सातत्याने वाढत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत 65.78 टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे आयोगाने म्हटले आहे. तर 65.55 टक्के पुरुष मतदारांनी यात सहभाग घेतला. तर 2024 मध्ये निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवारांची संख्या 800 होती. तर 2019 मध्ये ही संख्या 726 होती, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने पुढे म्हटले आहे की, 2019 च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांची संख्या 46.4 टक्के वाढली आहे. 2024 मध्ये 90,28,696 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली होती. तर 2019 मध्ये ही संख्या 61,67,482 होती.

COMMENTS