Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल, सीएनजी पंपाची डीलरशीप देतो म्हणून 61 लाखांची फसवणूक

लातूर प्रतिनिधी - पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंपाची डीलरशीप मंजूर करतो म्हणून येथील एकाची 61 लाख 17 हजार 500 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घड

बीव्हीजी डेव्हलपर्सची 7 कोटींची फसवणूक
राहुरीत पतसंस्थेत 46 लाखांचा अपहार
पुण्यामधील डॉक्टरची एक कोटीची फसवणूक

लातूर प्रतिनिधी – पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंपाची डीलरशीप मंजूर करतो म्हणून येथील एकाची 61 लाख 17 हजार 500 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिसांत गुरुवारी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, आरोपी मनीष अग्रवाल व रवी भल्ला या दोघांनी संगनमत केले. त्यांनी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील अमोल व्यंकटराव सौदागर यांना तुम्हाला पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंपाची डीलरशीप मंजूर करतो असे सातत्याने सांगितले. विविध बँकांचे खाते क्रमांक देऊन ऑनलाईनरित्या पैसे पाठविण्यास सांगितले. दरम्यान, वॉटस्अपद्वारे सौदागर यांना वारंवार पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपाचे बनावट प्रमाणपत्र पाठवित 61 लाख 17 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अमोल सौदागर यांच्या फिर्यादीवरुन औराद शहाजानी पोलिसांत विविध कलमान्वये गुरुवारी वरील दोघांविरुध्द सपोनि. पंकज शिनगारे यांनी वरील दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोंडारे हे करीत आहेत.

COMMENTS