Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांजाची विक्री करणारा सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त 

कोतवाली पोलिसांची कारवाई

अहमदनगर : बेकायदेशीर रित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमाला कोतवाली पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सहा हजार २०० रुपये किमती

एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडूंचा सरस कामगिरी
Sangamner : अखेर त्या मुजोर सहाय्यक पोलीस निरीक्षिकेची बदली
क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा फुले यांना भारतरत्न द्या : माधवराव तिटमे

अहमदनगर : बेकायदेशीर रित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमाला कोतवाली पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सहा हजार २०० रुपये किमतीचा ३६३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनीचौक ते सबजेल चौक रस्त्यावरील होसिंग हॉस्पिटल जवळ केली.  

   या बाबतची माहिती अशी की शनिचौक ते सबजेल रोडवर एका झाडाखाली पत्र्याच्या शेडच्या आडोशाला एक इसम गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरक्षक यादव यांनी पथकाला कारवाई च्या सूचना दिल्या. सबजेल रस्त्यावर सापळा लावून कोतवाली पोलिस थांबलेले असताना एक इसम पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी लगेच संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव जुनेद मुजाहीद शेख (वय ३३ वर्ष, रा.बेलेश्वर कॉलनी, विजय लाईन, भिंगार अ.नगर) असे असल्याचे सांगितले.त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील बॅगेत  गांजा आढळून आला. ६२ पुड्यामध्ये एकुण ३६३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. 

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्यात अंमली औषधे द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८(क) सह २० (ब) (२) (क),२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुखदेव दुर्गे अधीक तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उप निरीक्षक सुखदेव दुर्गे, पोलिस उप निरीक्षक प्रविण पाटील, पोलिस हवालदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे,गोरख काळे, अब्दुल कादर इनामदार, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, याकुब सय्यद, राहुल गुंडु, प्रशांत बोरुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

COMMENTS