Homeताज्या बातम्यादेश

मॉस्किटो क्वॉईलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : मॉस्किटो क्वॉईलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री दिल्ली येथे घडली. स्थानिक शस्त्री पार्क प

आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ : राजेश टोपे
जिल्हा परिषदेच्या समुद्रात निंबाळकरांनी वेगळेपण जोपासले-जिल्हाधिकारी
शिवसेनेच्या इतिहासातली सर्वात मोठी बंडखोरी : अनंत गीते | LokNews24

नवी दिल्ली : मॉस्किटो क्वॉईलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री दिल्ली येथे घडली. स्थानिक शस्त्री पार्क परिसरात हा प्रकार घडला असून याबाबत शुक्रवारी सकाळी माहिती मिळाल्याचे ईशान्य दिल्लीच्या पोलिस उपायुक्त यांनी सांगितले.

यासंदर्भातील माहितीनुसार दिल्लीच्या शास्त्रीपार्क परिसरात गुरुवारी रात्री डासांपासून बाचावासाठी मॉस्किटो क्वॉईल लावून एक कुटुंब झोपी गेले. त्यानंतर मॉस्किटो क्वॉईलची ठिणगी पडून उशीला आग लागली त्यात भाजून 2 जणांचा मृत्यू झाला. तर यावेळी झालेल्या धुरात मॉस्किटो क्वॉईलमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड त्यात मिसळल्यामुळे 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेबाबत आज, शुक्रवारी सकाळी माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्वांना तत्काळ नजीकच्या चंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी 6 लोकांना मृत घोषित केले. दरम्यान 2 लोकांवर उपचार सुरू असून 22 वर्षीय जखमी तरुणावर प्राथमिक उपचार करून त्याला डिस्चार्ज करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 4 पुरुष, एक महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत बालकाचे वय दीड वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

विषारी धुराने 9 जण पडले होते बेशुद्ध – पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, पाहिले की, घरातील सर्व 9 लोक बेशुद्ध पडले आहेत. पोलिसांनी तत्काळ सर्वांना जवळच्या चंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी 6 लोकांना मृत घोषित केले. दरम्यान 2 लोकांवर उपचार सुरू असून 22 वर्षीय जखमी तरुणावर प्राथमिक उपचार करून त्याला डिस्चार्ज करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार मृतांमध्ये 4 पुरुष, एक महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत बालकाचे वय दीड वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, खोलीत डास घालवण्याचे क्वाइल जळत होते. रात्रीच्या वेळी ते अंथरुणावर पडले त्यामुळे खोलीत आग लागली. त्यावेळी खोलीत धूर पसरला व गुदमरून सर्वांचा मृत्यू झाला.

COMMENTS