Homeताज्या बातम्यादेश

भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

बेळगाव/वृत्तसंस्था ः बेळगावच्या सौंदत्ती येथील प्रसिद्ध यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्

पुण्याहून रिसोड कडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात
पनवेल-स्वारगेट बसला अपघात, 20 प्रवासी जखमी
ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात तिघांचा जागेवरच मृत्यू.

बेळगाव/वृत्तसंस्था ः बेळगावच्या सौंदत्ती येथील प्रसिद्ध यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16 जण जखमी झाले आहेत. रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावाजवळ काल मध्यरात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला व दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
श्री यल्लमा देवी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत आहे. प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला यल्लामा देवीची यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोव्यातून लाखो भाविक सौंदत्तीच्या डोंगरावर जातात. कोरोना काळात बंद असलेले यल्लमा देवीचे मंदिर मागील वर्षापासून पुन्हा खुले झाले आहे. इथे दरवर्षीचे उत्सव धूमधडाक्यात सुरू झाले आहेत. त्यामुळे भाविकांची गर्दीही वाढली आहे. मृत भाविक देवीच्या यात्रेसाठी निघाले होते. अपघातग्रस्त पिकअप वाहनातून 23 जण प्रवास करत होते. नागमोडी रस्त्यांमुळे चालकाचा ताबा सुटला आणि ही गाडी मोठ्या झाडाला जाऊन आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की गाडी उलटीपालटी झाली. अपघातात पाच जण जागीच ठार झाले. तर, एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हनुमाव्वा म्यागडी (वय 25), दीपा (वय 31), सविता (वय 17), सुप्रीता (वय 11), मारुती (42 वर्षे), इंदिरव्वा (24 वर्षे) अशी मृतांची नावे असून हे सर्व जण रामदुर्ग तालुक्यातील हुल कंद गावाचे रहिवासी होते.

COMMENTS