Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये विचित्र अपघातात 6 जणांचा मृत्यू

दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू बस जळून खाक

नाशिक प्रतिनिधी - नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघातात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला. या भीषण अपघातात 6 ज

जामखेड-आष्टी रोडवरील भीषण अपघातात 5 जण ठार
परभणीत भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
मालवाहू ट्रक आणि छोटा हत्ती यांची समोरासमोर धडक.

नाशिक प्रतिनिधी – नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघातात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक-सिन्नर महामार्गावर एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला आहे. या अपघातात एका एसटी बसमध्ये 45 प्रवासी होते. पळसे गावाजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर वाहनांचा वेग कमी झाल्याने पाठीमागून येणारी पुणे-नाशिक एसटी बस पुढील 3 दुचाकी आणि एसटी बसला धडकल्याने अपघात झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे पळसे गावाजवळ हा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना चिरडले. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने प्रवाशांनी धावत्या बसमधून उडी मारली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात 2 दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातांच्या कारणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. बसने पेट घेतल्यानंतर मागी बाजूच्या आपत्कालीन खिडकीतून प्रवाशांना खाली उतरविण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. अपघातात एसटी बसच्या काचा फुटल्याने अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसने पेट का घेतला? बस नादुरुस्त होती का? याचा अहवाल मागवण्यात येण्यात आहे. आरटीओ आणि एसटी विभागाकडून अपघातग्रस्त बसची माहिती घेण्यात येणार आहे.

COMMENTS