नवी दिल्ली ः नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून हा अपघात झाला. नेपाळच्या मधेश प्रांतात ही घटना घडली. या अपघातामध्ये सहा भारतीयां

नवी दिल्ली ः नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून हा अपघात झाला. नेपाळच्या मधेश प्रांतात ही घटना घडली. या अपघातामध्ये सहा भारतीयांसह 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीमध्ये कोसळली. मधेश प्रांतात डोंगराळ भागातून जाणारी ही बस 50 मीटर खोल दरीत असलेल्या नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये सहा भारतीय भाविकांसह सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये 19 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे मधेश प्रांतातील बारा जिल्ह्यात हा अपघात झाला. राजस्थानवरुन भाविकांना ही बस घेऊन जात होती. ही बस दरीमध्ये कोसळून चुरियामाई मंदिराच्या दक्षिणेला नदीच्या काठावर पडली. रस्त्यापासून सुमारे 50 मीटर खाली ही बस कोसळली. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये सहा भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे.
COMMENTS