Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय किक बॉक्सिंगमध्ये जामखेडला 6 सुवर्णपदके

जामखेड ः राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा अहमदनगर येथील वाडीया पार्क मध्ये नूकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये जामखेड मधील विविध उत्तुंग कामगिरी करत

भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू
आर्थिक शिस्त पाळणार्‍या वित्तीय संस्था यशस्वी ः माजी खा. तनपुरे
विद्यार्थिनींनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू

जामखेड ः राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा अहमदनगर येथील वाडीया पार्क मध्ये नूकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये जामखेड मधील विविध उत्तुंग कामगिरी करत विविध पदके जिंकली. यावेळी स्पर्धांमध्ये 900 विध्यार्थी सहभागी होते. जिल्हा यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन मकासारे, कोच ज्ञानेश्‍वर जमदाडे, गोकुळ, महिंद्र, ओंकार, थापा, जयेश  व इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट शाहनवाज शेख व ओंकार राठोड उपस्थित होते.
यामध्ये संकेत जमदाडे याने म्युझिकल पॉइंट फाईट व लाईट कोनट्याक मध्ये 3 गोल्ड मेडल मिळवले आहे. सानिका हुलगुंडे हिने म्युझिकल व लाईट कोनट्याक मध्ये 2 गोल्ड मेडल मिळवले आहे. शिवानी वीर हिने किक लाईट मध्ये गोल्ड मेडल तर पॉइंट फाईट मध्ये सिलवर मेडल मिळवले आहे. ऋषिकेश बाबरने लाईट कोनट्याक मध्ये सिलवर मेडल मिळवले आहे. बुद्धभूषण आव्हाड याने म्युझिकल मध्ये ब्राऊन्स मेडल मिळवले आहे. तर कार्तिकी पोतदार हिने म्युझिकल मध्ये ब्राऊन्स मेडल मिळवले आहे. वैष्णव जायभाय, नुपूर सातपुते, आर्यन ढवळे हे पण सहभागी झाले होते. जामखेडने एकूण 6गोल्ड मेडल, 2 सिलवर, 2 ब्राऊन्स मेडल मिळवले आहे. या विद्यार्थ्यांची नॅशनल साठी निवड झाली आहे. विजेत्या विद्यार्थीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS