भगवान श्रीकृष्णाची नगरी, अशी मथुरा शहराची ओळख आहे. मात्र, सध्या हे शहर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. तेथील उंदरांना चरस खाण्याचं व्यसन ल

भगवान श्रीकृष्णाची नगरी, अशी मथुरा शहराची ओळख आहे. मात्र, सध्या हे शहर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. तेथील उंदरांना चरस खाण्याचं व्यसन लागलं आहे, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. पोलीस ठाण्यातील स्टोअर हाउसमध्ये जप्त करून ठेवलेलं 581 किलो चरस उंदरांनी खाऊन टाकल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पोलिसांना जप्त केलेल्या चरस या अंमली पदार्थाबाबत विचारणा केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. उपद्रवी उंदरांचा बंदोबस्त करण्यास अपयश आल्याचं पोलिसांनी हतबल होऊन सांगितलं आहे.शेरगड व महामार्ग पोलीस स्टेशननं 581 किलो चरस जप्त करून मालखान्यात ठेवलं होतं. हेच चरस उंदरांनी खाल्ल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. न्यायालयानं पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर उंदरांच्या उपद्रवावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या शिवाय, न्यायालयाने पोलिसांना पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे.
COMMENTS