Homeताज्या बातम्यादेश

पश्‍चिम बंगालमध्ये 58 लाख मतदार वगळले

एसआयआरविरोधात तृणमूल काँगे्रस सर्वोच्च न्यायालयातनवी दिल्ली ः पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकारण तापत असतांना स्पेशल इंटें

राजकारणातील हरवलेला संवाद .. !
जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर !
बिनविरोध’ निवड – लोकशाहीची प्रगल्भता की ‘सेटलमेंट’?

एसआयआरविरोधात तृणमूल काँगे्रस सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकारण तापत असतांना स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन एसआयआरमुळे वातावरण तापतांना दिसून येत आहे. एसआयआर करतांना पश्‍चिम बंगालमधील मतदार यादीतून कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल 58 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी दाखल केली असून, निवडणूक आयोगाने स्वतःच्याच नियमावलीचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याचिकेनुसार, 16 डिसेंबर 2025 रोजी पश्‍चिम बंगालची ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र कोणतीही नोटीस न देता किंवा वैयक्तिक सुनावणीची संधी न देता 58,20,898 मतदारांची नावे वगळण्यात आली. 2025 च्या स्पेशल समरी रिव्हिजननंतर एकूण मतदारसंख्या 7 कोटी 66 लाखांहून घटून 7 कोटी 8 लाखांवर आली आहे. निवडणूक आयोगाने 11 ऑगस्ट 2023 रोजी मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी जी सविस्तर मानक कार्यपद्धती जाहीर केली होती, त्याच्याच विरोधात ही कारवाई झाल्याचे टीएमसीचे म्हणणे आहे. याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की अंतिम मतदार यादी 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर लगेचच पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सदोष आणि अपूर्ण मतदार यादी गोठवली जाईल आणि चुकीच्या पद्धतीने मताधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेल्या नागरिकांना न्याय मिळण्याची संधीच राहणार नाही, अशी भीती टीएमसीने व्यक्त केली आहे. डेरेक ओ’ब्रायन यांनी निवडणूक आयोगावर आणखी एक गंभीर आरोप करताना म्हटले आहे की एसआयआर प्रक्रियेदरम्यान फील्ड अधिकार्‍यांना लेखी आदेश न देता व्हॉट्सअ‍ॅप किंवा तोंडी स्वरूपात सूचना दिल्या जात आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये एसआयआर सुरू झाल्यापासून 50 पेक्षा जास्त वेळा बीएलओ, ईआरओ, एईआरओ आणि डीईओ यांना अशा अनौपचारिक आणि नोंद नसलेल्या सूचना देण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

COMMENTS