पुणे ः पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असतांना सोमवारी पुणे उत्पादन शुल्क विभागात आमदार रवींद्र दांडेकर आणि सुषमा अंध
पुणे ः पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असतांना सोमवारी पुणे उत्पादन शुल्क विभागात आमदार रवींद्र दांडेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन करत अधिकार्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कोणत्या बार आणि पब मालकाकडून किती हप्ता दिला जातो तसेच कोणत्या अधिकाराला दिला जातो, याची यादीच आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी अधिकार्यांसमोर वाचून दाखवली. मागच्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील बार आणि पब माध्यमातून 500 कोटी रुपयांची वसुली झाली असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी या वेळी केला आहे.
हातात खोके आणि पैसे घेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी पुण्यात आंदोलन केले. पुण्याची अवस्था ही उडता पंजाब सारखी झाली असल्याचा आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी केला आहे. उत्पादक शुल्क विभागाची वसुलीची यादी वाचली तर ती लग्नातील आहेराची यादी वाचण्यासारखे असल्याचे देखील सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. मागील वेळी ललित पाटील प्रकरणात देखील आम्ही या वसुलीचा आरोप केला होता. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. ललित पाटील प्रकरणात देखील अजय तावरे यांचे नाव घेतले होते. यांच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एकाही पोलिस अधिकार्याशी आमचे वैर नाही. मात्र तुम्ही पुणेकरांच्या जीवाशी का खेळत आहात? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. आमदार धंगेकर आरोप करत असतानाच संबंधित पोलिस अधिकर्यांच्या वतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच संतापले. एक आमदार म्हणून मी या ठिकाणी बोलायला आलो आहे. त्यामुळे मला शिकवू नका, असा कडक इशारा आमदार रवींद्र धंदेकर यांनी राज्य उत्पादन विभागातील अधिकार्यांना दिला. तुम्ही विधानसभेत नाही तर माझ्यासमोर बोलत आहात. त्यामुळे मला शहाणपणा शिकवू नका, अशा शब्दात रवींद्र धंगेकर यांनी अधिकार्यांना चांगलेच सुनावले. पुणे शहरात सुरू असलेल्या अवैध बारची यादी आमच्या समोर द्या, या बारवर आजपर्यंत का कारवाई करण्यात आली नाही? असा सवाल देखील रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.
अधिकार्यांनी फेटाळले आरोप – आमदार रवींद्र धंगेकर आणि आणि सुषमा अंधारे यांनी आमच्यावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा संबंधीत अधिकार्यांनी या वेळी माध्यमांसमोर केला. तरी देखील या विभागाचा जिल्हाप्रमुख म्हणून अशा पद्धतीने काही असेल तर याबाबत चौकशी करण्यात येईल आणि यामध्ये दोष असणार्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी म्हटले आहे.
COMMENTS