कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देशभरात जनक्षोभ उस
कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देशभरात जनक्षोभ उसळला होता. त्यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र मध्यंतरी कनिष्ठ डॉक्टरांनी आपला बंद मागे घेत कामावर हजर झाले होते. त्यानंतर पुन्हा या डॉक्टरांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये मंगळवारी सामूहिक राजीनामे देण्यात आले. आमरण उपोषण करणार्या कनिष्ठ डॉक्टरांच्या समर्थनार्थ 50 वरिष्ठ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विभाग आणि त्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. एका वरिष्ठ सदस्याने सांगितले, ’कनिष्ठ डॉक्टर एका कारणासाठी आमरण उपोषण करत आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि हा संदेश देण्यासाठी आम्ही राजीनामा दिला आहे. सहा कनिष्ठ डॉक्टरांच्या आमरण उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस आहे. ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही बाह्य दबावापुढे झुकणार नाही. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा या डॉक्टर आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS