Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात होणार 5 हजार कोटींची गुंतवणूक

पुणे : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. मात्र रोजगाराच

अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाई रकमेत दुपटीने वाढ
ठाकरेसेना नसून शिल्लकसेना
बेळगावात फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

पुणे : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. मात्र रोजगाराची वाट पाहणार्‍या सर्व बेरोजगार तरुणांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पाच हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प येत असल्याचे सांगितले आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
राज्यात पुणे फायनान्स हब होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुणे शहरात मोठे गुंतवणूक प्रकल्प येत आहेत. बजाज फिनसर्व कंपनी राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुणे येथे होणार आहे. यामुळे 40 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. अलीकडच्या काळातील राज्यात झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हिंदुजा ग्रुप महाराष्ट्रात एकूण 12 क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक तब्बल 35 हजार कोटी रुपयांची आहे. या गुंतवणुकीतून दीड लाख नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा सरकारने केला होता. या गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सायबर, मनोरंजन, नवीन टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्टरिंग अशा विविध विभागांचा समावेश होणार आहे. याबद्दलची माहिती हिंदुजा समूहाचे मुख्य जी पी हिंदुजा यांनी दिली होती.

COMMENTS