मुंबई-पुणे ’एक्स्प्रेस-वे’वरील अपघातात 5 जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे ’एक्स्प्रेस-वे’वरील अपघातात 5 जणांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस-वे) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने निघालेल्या

रस्त्याच्या कडेला उभ्‍या असलेल्या चिमुकल्याला कारने चिरडले
बुलेटवर बसलेल्या महिलेचा ओढणीने घेतला जीव
गाडी दरीत कोसळली, 12 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई प्रतिनिधी: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस-वे) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने निघालेल्या या कारला एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
बोरघाटात झालेल्या या अपघातात 5 जण मृत्यूमुखी पडले असून तिघे जण जखमी झाले आहेत. इर्टिगा गाडीला दुसर्‍या वाहनाची धडक बसल्याने हा अपघात झाला. या धडकेमुळे गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली आणि दरवाजा तुटल्याने प्रवासी बाहेर पडले. अति रक्तस्त्रावामुळे काहींचा मृत्यू झाला. सगळे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातले असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे. जखमींना पनवेलमध्ये एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच महामार्गावरुन जाणार्‍या व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

COMMENTS