Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरजेतील अपघातात 5 जणांचा मृत्यू

मिरज : मिरजेजवळील राजीवनगर येथे राष्ट्रीय महार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होउन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले

भरधाव दुचाकीस्वाराने तरुणाला दिली धडक
अनियंत्रित भरधाव बसने अख्या कुटुंबाला चिरडले.
बिहारमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू

मिरज : मिरजेजवळील राजीवनगर येथे राष्ट्रीय महार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होउन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. बुधवारी सकाळी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे (ता. राधानगरी) येथील रहिवासी आहेत.
या अपघातात जयवंत पवार (वय 45), कोमल शिंदे (वय 60), लखन शिंदे (वय 60) आणि सोहम शिंदे (वय 12) या एकाच कुटुंबातील चौघांसह चालक असे पाच जण जागीच ठार झाले, चालकाचे नाव अद्याप समजू शकले नाही. या अपघातात अन्य तीन जखमी असून यामध्ये एका महिलेचा समावेश असून दोन मुली आहेत. अपघातग्रस्त बोलेरोमधील सर्वजण कोल्हापूरहून पंढरपूरला निघाले होते. यावेळी विटा घेऊन येणार्‍या ट्रॅक्टरने राँग-साईडने येऊन बोलेरोला समोरासमोर धडक दिली. यात एकाच कुटुंबातील 5 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर 2 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर मिरजपासून सुरु होणार टप्पा मंगळवार 16 मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग अपघात घडला.

COMMENTS