Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा-जावलीतील 26 ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख ; आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा

सातारा / प्रतिनिधी : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील 26 ग्रामपंचायतींच्या नवीन इमारत बांधकामासाठी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या म

उंबर्डे फाट्यावरील ’त्या’अपघातातील जखमीचा मृत्यू
नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई
ग्रामपंचायत निवडणूकीस यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवा : पालकमंत्री

सातारा / प्रतिनिधी : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील 26 ग्रामपंचायतींच्या नवीन इमारत बांधकामासाठी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून तब्ब्ल 5 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजनेतून हा निधी मंजूर झाला. मंजूर निधीतून सातारा तालुक्यातील 13 आणि जावली तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींना नवीन स्वतंत्र कार्यालय इमारत बांधून मिळणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन इमारतींमुळे या 26 ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुरळीतपणा येण्यास मदत होणार आहे. सातारा तालुक्यातील वेणेखोल, बेंडवाडी, मोरेवाडी, निगुडमाळ, पिलाणी, मस्करवाडी, वावदरे, राकुसलेवाडी, आरगडवाडी, बोपोशी, चाळकेवाडी, साबळेवाडी आणि पेट्री-अनावळे या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
जावली तालुक्यातील कुंभारगणी, शिंदेवाडी, अंधारी कास, मरडमुरे, पानस, म्हाते बु।, केसकरवाडी, काटवली, वरशी, रानगेघर, बामणोली, कसबे, मोहाट आणि नांदगणे या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालय इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर इमारतींचे बांधकाम त्वरित सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

COMMENTS