शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना संधीमुंबई ः विधानपरिषदेच्या रिक्त पाच जागेसाठी भाजपने रविवारीच आपले तीन उमेदवार जा

शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना संधी
मुंबई ः विधानपरिषदेच्या रिक्त पाच जागेसाठी भाजपने रविवारीच आपले तीन उमेदवार जाहीर केले होते, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसने आपले उमेदवार जाहीर केले नव्हते. सोमवारी अखेरच्या क्षणी शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली.
भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीकडून पाचही उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर न करण्यात आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज मंगळवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 20 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर, मतदानाची तारीख 27 मार्च आहे. मात्र, पाचपेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते. विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असली तरी विरोधी पक्षांनी मात्र उमेदवार दिलेला नाही. कारण विधानसभेत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे उमेदवार दिला तरी यश मिळणार नसल्याची खात्री असल्याने महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकजून अनेक जण या जागेसाठी इच्छुक होते. मात्र, शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. चंद्रकांत सूर्यवंशी हे 1992 पासून राजकारणात सक्रीय आहेत.
COMMENTS