इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी 85 पैकी 49 अर्ज माघार घेण्यात आले. त
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी 85 पैकी 49 अर्ज माघार घेण्यात आले. तर राष्ट्रवादीचे माजी सभापती आनंदराव पाटील साखराळे यांचा अर्ज अपात्र ठरला. त्यांच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता.
सहकारी संस्था गट सर्वसाधारण मतदार संघ – 15, महिला मतदार संघ – 4, इतर मागास प्रर्वग संघ – 2, भ.वि.जा./ज मतदासंघ – 2, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ – 3, अनु.जाती / जमाती मतदारसंघ – 2, आर्थिक दुबर्ल मतदार संघ – 2, आडते व व्यापारी मतदार संघ – 4, हमाल व तोलाईदार मतदार संघ – 2 असे एकूण 36 अर्ज शिल्लक राहिले आहेत.
राष्ट्रवादी विरोधात प्रथमच सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित येत शेतकरी परिवर्तन पॅनेल उभा करत एकास एक उमेदवार दिले आहेत. या बाजार समितीवर राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील व स्व.आ. विलासराव शिंदे गटाची सत्ता होती. गेली अनेक वर्षे विरोधकांच्यात एकी दिसून येत नव्हती. यामुळे राष्ट्रवादी चे सर्व उमेदवार निवडूण येत होते. यावेळी मात्र विरोधकांनी चांगलाच चंग बांधला असून शेतकरी पॅनेलच्या झेंड्याखाली एकत्रित येत एकत्र लढत देण्याचे ठरले आहे.
COMMENTS