रेणुका आश्रमात पंचेचाळीसावा शारदीय नवरात्र महोत्सव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेणुका आश्रमात पंचेचाळीसावा शारदीय नवरात्र महोत्सव

श्रीरामपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रमात सोमवार दि २६ सप्टेंबर पासून पंचेचाळीसावा शारदीय नवरात्र म

यशोधन कार्यालयाकडून काकडवाडीतील आदिवासी कुटुंबास मदत
काकडे महाविद्यालयात अविष्कार संशोधन स्पर्धेत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर
पुणतांब्यावरून तालुक्याला जाण्यासाठी बस नसणे दुर्देवी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रमात सोमवार दि २६ सप्टेंबर पासून पंचेचाळीसावा शारदीय नवरात्र महोत्सव आरंभ होत असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती आश्रमाचे प्रमुख व मुख्य विश्वस्त मौनयोगी रेवणनाथ महाराज यांनी दिली आहे. 
गेले दोन वर्षे कोरोना संकटामुळे मोठ्या स्वरूपात महोत्सव होऊ शकला नाही मात्र आता संकट टळल्यामुळे व निर्बंध शिथिल केल्याने महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. प्रतिपदेला राजराजेश्वरी रेणुका देवी महापूजा व घटस्थापना व सप्तशती पाठारंभ होऊन महोत्सव सुरूवात होणार आहे. शुक्रवारी ललिता पंचमी निमित्ताने ललिता सहस्र नामावली व कुंकूम अर्चन होणार आहे. सोमवार दि 3 आक्टोबर रोजी दुर्गा अष्टमी निमित्ताने फुलोरा तसेच खिचडी महाप्रसाद होणार आहे. सौ ज्योती बाई जयकुमार गुगळे परिवार नेवासा यांच्या तर्फे खिचडी प्रसाद दिला जाणार आहेमंगळवार दि ४ आक्टोबर रोजी महानवमी निमित्ताने नवचंडी होमहवन होईल तसेच कुमारिका पूजन केले जाणार आहे. बुधवारी दि ५ आक्टोबर रोजी विजयादशमी निमित्ताने सीमोल्लंघन, शस्त्रपूजन व शमीपूजन होणार आहे. नवरात्र महोत्सव काळात रोज पहाटे साडेपाच व सायंकाळी सहा वाजता महाआरती होणार आहे. नवरात्र महोत्सव निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली असून अशोक सहकारी साखर कारखाना सौजन्याने देवस्थान कमान नुतनीकरण करण्यात आले आहे. वडाळा महादेव ग्रामपंचायतीच्या वतीने रेणुका देवी मंदिराकडे येणाऱ्या रस्तावर पथदिवे बसवण्यात येणार आहेत.तरी नवरात्र महोत्सव निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी उपासना परिवार तसेच श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रम ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS