Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसब्यात 45 तर, चिंचवडमध्ये 41 टक्के मतदान

पुणे/प्रतिनिधी ः कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी रविवारी मतदान पार पडलं असून, चिंचवडमध्ये 41.06 टक्के मतदान, तर कसब्यात 45.25 टक्के मतदान

सातार्‍यात वाहन दंड कमी करण्यासाठी आंदोलन
चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!
दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला

पुणे/प्रतिनिधी ः कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी रविवारी मतदान पार पडलं असून, चिंचवडमध्ये 41.06 टक्के मतदान, तर कसब्यात 45.25 टक्के मतदान झालं आहे. या दोन्ही मतदारसंघातील मतांची मोजणी 02 मार्च रोजी होणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. कसबा पोटनिवडणुकीत एकूण 16 आणि चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीची रंगत अधिकच वाढल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. रविवारी सकाळी सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेत तब्बल 13 मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली होती. चिंचवड येथे मतदान सुरू असतांना 8 मशीन बंद पडल्या आहेत. यामुळे येथील मतदान काही वेळ थांबवावे लागले. यामुळे मतदारांना रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. मात्र, काही वेळाने निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या टीमने इव्हिएम मशिन बदलल्या आणि मतदान प्रक्रिया सुरळीत केली.

COMMENTS