तेलीखूंटला घरफोडीत 41 हजाराची चोरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तेलीखूंटला घरफोडीत 41 हजाराची चोरी

अहमदनगर : तेलीखुंट येथे घरफोडी करीत चोरट्यांनी 40 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. 1 डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी संदीप अशोक शेंदूरकर (र

खुनातील आरोपी अटक टाळण्यासाठी रुग्णालयात
प्रगतशील शेतकरी मधुकर उगले यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार मदत 
हॉकी स्पर्धेत ‘गौतम’च्या विद्यार्थ्यांचे यश 

अहमदनगर : तेलीखुंट येथे घरफोडी करीत चोरट्यांनी 40 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. 1 डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी संदीप अशोक शेंदूरकर (रा. पॉवर हाऊसजवळ तेलीखूंट) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून चांदीचे नाणे, दोन पितळी डबे व रोख रक्कम असा एकूण 40 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोना कांबळे करीत आहेत.

COMMENTS