Homeताज्या बातम्यादेश

देशात विविध आजारांवरील 41 औषधे होणार स्वस्त

नवी दिल्ली ः भारतासारख्या देशामध्ये एकदा का आजार मागे लागला की, त्यासाठी लागणारी औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात. मात्र आता मधुमेह, ह

पुण्यात गाडी घासल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
बारा हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस – अभिजीत राऊत 
माजी आमदार पिचड यांच्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू

नवी दिल्ली ः भारतासारख्या देशामध्ये एकदा का आजार मागे लागला की, त्यासाठी लागणारी औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात. मात्र आता मधुमेह, हृदयविकार, इन्फेक्शनसह विविध आजारांवरील 41 औषधे स्वस्त होणार आहे. फार्मास्युटिकल्स अँड नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी विभागाने या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एनपीपीएच्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मधुमेह, अंगदुखी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तक्रारी, यकृताच्या समस्या, अँटासिड, संक्रमण, अ‍ॅलर्जी, मल्टीव्हिटॅमिन आणि अँटीबायोटिक्ससाठी असलेल्या औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
‘एनपीपीएसारख्या नियामक संस्थेसाठी औषधे आणि फॉर्म्युलेशनच्या किमती बदलणे हे एक प्रकारचे नियमित काम आहे. जनतेला आवश्यक असलेल्या औषधांच्या किंमती मर्यादेत राहतील आणि औषधांचा खर्च परवडणारा राहील, याची काळजी आम्ही घेत असतो, असे एनपीपीएच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यानं सांगितले. भारतात 10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. या बाबतीत भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. या आजारावरील औषधांच्या किंमतीत झालेल्या कपातीचा फायदा डायबेटीसची औषधे आणि इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या अनेक रुग्णांना होणार आहे.

COMMENTS