Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात मनसेला धक्का 400 कार्यकर्त्यांनी सोडला पक्ष

पुणे प्रतिनिधी - मुंबई आणि ठाणे जिल्ह्यानंतर मनसेचे सर्वाधिक प्राबल्य हे पुणे आणि नाशिक जिल्ह्यात दिसून येते. मात्र लोकांशी नाळ जोडलेल्या नेत्

ओडिशात 8 भाविकांचा अपघातात मृत्यू
तरुणीचं फिल्मी स्टाइलनं अपहरण | DAINIK LOKMNTHAN
शेवगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी बंद

पुणे प्रतिनिधी – मुंबई आणि ठाणे जिल्ह्यानंतर मनसेचे सर्वाधिक प्राबल्य हे पुणे आणि नाशिक जिल्ह्यात दिसून येते. मात्र लोकांशी नाळ जोडलेल्या नेत्यांना डावलले जात असल्याचा सूर मनसेतून निघू लागला आहे. पुण्यात मात्र, मनसेला खिंडार पडले आहे. वसंत मोरे यांचे जवळचे कार्यकर्ते असणारे, नीलेश माझिरे यांची दीड महिन्यांपूर्वी मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्यांनी पक्षाला राम राम केला आहे. तब्बल 400 कार्यकर्त्यांना घेऊन ते बाहेर पडल्याने ते पक्षाला खिंडार पडले आहे.


येत्या काही दिवसांत महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत. मात्र, त्या पूर्वीच पक्षाला खिंडार पडल्याने मनसेला हा मोठा धक्का समजला जात आहे. माझिरे यांनी यापूर्वीही मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. जून महिन्यात माझिरे हे मनसेतून बाहेर पडले होते. त्यानंतर ते पुन्हा पक्षात आले होते. आता पुन्हा एकदा माझिरे हे मनसेतून बाहेर पडले होते. मात्र, राज ठाकरे यांनी माझिरे यांची समजूत काढली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता. आता ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नीलेश माझिरे हे मनसेचे पुणे जिल्हा माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते. गेल्याच महिन्यात माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. नीलेश माझिरे हे वसंत मोर यांच्या खास जवळचे समजले जातात. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानानंतर माझिरे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मोरे यांना पक्षातील पदाधिकारी विश्‍वासात घेत नाहीत. बैठकांना बोलावत जात नाहीत मेळाव्याला, सभांना गेले तरी, भाषण करण्याची संधी देत नाहीत असे आरोप केले होते. याचा विरोध त्यांनी केला होता. या बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, दीड महिन्यांपूर्वी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या कारवाई मुळे माझिरे हे नाराज होते. यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तब्बल 400 कार्यकर्त्यांसह त्यांनी मनसेला राम राम केला आहे. माझिरे यांची हकालपट्टी आणि राजीनामा यामुळे पुणे मनसेत धुसफूस असल्याचे पुढे आले आहे. गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. मोरे यांनी पक्षाच्या प्रमुखांवर केलेल्या आरोपानंतर माझिरे हे पक्षातून बाहेर पडले आहे.

COMMENTS