सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांना नवीन धोरणानुसार 26 हजार 631 टन साखर निर्यात करण्याचा कोटा मंजूर झाला आहे. केंद्र सरकारने सुर
सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांना नवीन धोरणानुसार 26 हजार 631 टन साखर निर्यात करण्याचा कोटा मंजूर झाला आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या तात्काळ मंजुरीसाठी एक खिडकी योजनेचा लाभ न मिळणे, निर्यात मर्यादेचे बंधन याचा फटका बसलेला असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, यामुळे जिल्ह्यातील शिल्लक साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात राहणार आहे.
एकीकडे देशातून सलग चौथ्या वर्षी साखरेची उच्चांकी निर्यात झाली आहे. अद्यापही 15 लाख टन साखरेची निर्यात होऊ शकते. मात्र 24 मे रोजी केंद्र सरकारने महागाई रोखण्यासाठी उपाय म्हणून साखरेच्या निर्यातीसाठी मर्यादा घातली. शंभर लाख टनापेक्षा जादा साखर निर्यात होऊ शकणार नाही, असा शासनाचा आदेश आहे. यातून देशांर्तगत बाजारात साखरेचे भाव आवाक्यात राहण्यासाठीचा हा उपाय असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, निर्यात साखरेच्या मंजुरीसाठी एक जूनपासून तीन दिवसांकरिता केंद्राने एक खिडकी योजना सुरू केली. यातून कारखान्यांनी निर्यातीसाठी मागणी करायची होती. आता सरकारने आलेल्या प्रस्तावानुसार साखर निर्यातीचा कोटा मंजूर केला आहे. साधारणपणे मागणीच्या 45 टक्केच्या घरात साखर कोटा मंजूर झाल्याचे सकृतदर्शनी तरी दिसते.
COMMENTS