निघोज प्रतिनिधी ः बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला सन2023- 2024 या आर्थिक वर्षात संस्थेला 4 कोटी 72 लाख 25 हजार 804 रुपयाचा निव्वळ नफ
निघोज प्रतिनिधी ः बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला सन2023- 2024 या आर्थिक वर्षात संस्थेला 4 कोटी 72 लाख 25 हजार 804 रुपयाचा निव्वळ नफा झालेला असून संस्थेच्या 31 मार्च 2024 अखेर संस्थेच्या ठेवी 222 कोटी 45 लाख 43 हजार 610, कर्ज 146 कोटी 92 लाख 83 हजार 258, गुंतवणूक 125 कोटी 47 लाख 56 हजार 267, भागभांडवल 5 कोटी 94 लाख 89 हजार 644, निधी 33 कोटी 59 लाख 39 हजार 217, थकबाकी 3.95 टक्के नेट एनपीए 0 टक्के अशी संस्थेची आर्थिक परिस्थिती असून सर्व सभासद ठेवीदार खातेदार यांचा संचालक मंडळावर असणार्या विश्वासामुळे हे शक्य झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद यांनी सांगीतले. सर्व संस्थेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, यांनी संस्थेवर मोठ्या प्रमाणात दाखविलेला विश्वास व संस्थेच्या संचालक मंडळाने केलेले सहकार्य व सेवकांनी ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा या गोष्टी मुळे संस्थेच्या आर्थिक प्रगतीत वाढ झाली. आपण सर्वांनी पतसंस्थेवरती दाखविलेल्या विश्वासाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री वसंत कवाद यांनी संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, कर्मचारी वर्ग, हितचिंतक या सर्वांचे अभिनंदन केले.
संस्थेचा आर्थिक पाया भक्कम – पारनेर तालुक्यातील काही पतसंस्थेमध्ये आर्थिक अडचणींमुळे ठेवीदारांना ठेवीच्या रकमा मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांनी वीस ते एकवीस वर्षात संस्थेचा आर्थिक पाया अतिशय भक्कम केला आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या पतसंस्थेमध्ये ही संस्था अग्रगण्य आहे. मोठ मोठ्या पतसंस्थाना घरघर लागली असून बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीत अहवाल वर्षात साडे तेहसीस कोटींनी वाढ झाली असून नफा सर्वाधिक पावणेपाच कोटी झाला असून चेअरमन वसंत कवाद, व्हा.चेअरमन नामदेवराव थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांच्याच कार्याचे अनुकरण करीत पतसंस्थेला गतवैभव प्राप्त करून दिले असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
COMMENTS