Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने 38 लाखांची फसवणूक

पुणे ः ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने कमी काळात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 38 लाख 74 हजार रूपयांची सायबर चोरट्यांनी फस

दहा द्राक्ष बागायतदारांना जयपूरच्या व्यापाऱ्याकडून गंडा 
नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक
CSR फंडाचे आमिष दाखवून गावकऱ्यांची फसवणूक | LokNews24 |

पुणे ः ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने कमी काळात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 38 लाख 74 हजार रूपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्हॉटअप ग्रुपधारक व मोबाईलधार अद्वेत खन्ना नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात प्रविण सिन्हा (32, रा. मंत्रा मोटाना सोसायटी, धानोरी, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार 20 मार्च ते 15 जून दरम्यान ऑनलाईन घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुसर्‍या घटनेत मुंबई येथून बँककॉकला फेडेक्स पार्सल पाठविल्याचे सांगत आपण मुंबई क्राईम ब्रांच येथून अधिकारी बोलत असल्याचे म्हणत अटक करण्याची भीती दाखवली. तसेच मनी लाँड्रिगंची चौकशी करण्याचे बहाण्याने 18 लाख 64 हजार एका खात्यावर पाठविण्यास भाग पाडून फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जय महादेव भारमल (59, रा. कल्याणीनगर,पुणे) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय यांना एका मोबाईलधारक व्यक्तीने फोन केला. त्याने मुंबई येथील फेडेक्स कंपनी येथून मुंबई क्राईम ब्रांचचा अधिकारी हरदीप सिंग बोलत असल्याचे खोटे सांगितले. यावेळी त्याने आपली खोटी कागदपत्र ेदखवून जय यांनी मुंबईहून बँककॉकला फेडेक्स पार्सल पाठविले असल्याचे खोटे सांगितले. याबद्दल फिर्यादीला अटक करण्याची भिती दाखवली. तसेच सर्व प्रकरण मिटविण्यासाठी एनोसी प्रमाणपत्र देतो असे सांगितले. हे सांगत असतानाच तोतया क्राईमब्रांचच्या अधिकार्याने फिर्यादीच्या बँक खात्याची माहिती घेऊन मनी लाँड्रींग बाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या खात्यावरील 18 लाख 64 हजार रूपये सुरेश कन्स्ट्रक्शनच्या खात्यावर पाठविण्यास भाग पाडले.

COMMENTS