Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नव्या वर्षात 3500 लालपरी एसटीच्या ताफ्यात दाखल होणार : भरतशेठ गोगावले यांची माहिती

नागपूर : सन. 2025 मध्ये म्हणजे येणार्‍या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशान

विरोधकांना हार दिसत असल्यामुळेच हल्ला ः उत्कर्षा रूपवते
फडणवीसांचं वय पाहू नका… १०० अजित पवार ते खिशात घालून फिरतात…
कौटुंबिक हिंसाचार

नागपूर : सन. 2025 मध्ये म्हणजे येणार्‍या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे 3500 नव्या साध्या लालपरी बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली.
सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड कमतरता आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये आता 14 हजार बसेस असून करोना महामारीपूर्वी म्हणजे सन . 2018 मध्ये एसटी कडे तब्बल 18 हजार बसेस होत्या. परंतु गेल्या 3-4 वर्षात करोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच बसेसची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त बस फेर्‍या देणे शक्य होईना. या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या 2200 बसेस खरेदी करण्याचा व 1300 बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सुमारे साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट व्हायला सुरू होईल. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे, बसेसची दोन ,दोन तास वाट पाहत बसणे अशा तक्रारीला कमी होतील. असे प्रतिपादन गोगावले यांनी यावेळी केली.

COMMENTS