Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्तिकी यात्रे निमित्त साेमवारपासून पंढरपूरसाठी रेल्वेच्या ३५ फेऱ्या

पंढरपूर प्रतिनिधी - कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक ते आठ नोव्हेंबर दरम्यान लातूर-पं

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांस मोफत खत वाटप
महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने आमरण उपोषण घेतले माघार
ठाण्यात एका रात्रीत उपचारादरम्यान 17 रुग्णांच्या मृत्यू; अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत

पंढरपूर प्रतिनिधी – कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक ते आठ नोव्हेंबर दरम्यान लातूर-पंढरपूर, पंढरपूर-मिरज आणि सोलापूर-पंढरपूर अशा विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.पंढरपूर-मिरज विशेष गाडी पंढरपूर येथून एक, पाच, सात आणि आठ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटले. ती त्याच दिवशी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी दाखल मिरजला दाखल होईल. मिरज येथून त्याच दिवशी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी पोहचेल. लातूर-पंढरपूर विशेष गाडी लातूर येथून एक, दोन, चार, सात आणि आठ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुटेल. ती पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी बारा वाजून २५ मिनिटांनी दाखल होईल. त्यानंतर ती गाडी पंढरपूर येथून त्याच दिवशी दुपारी दोन वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी रात्री सात वाजून वीस मिनिटांनी दाखल होईल. सोलापूर -पंढरपूर डेमू ही गाडी एक ते आठ नोव्हेंबर दरम्यान दररोज सोलापूर येथून सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल. ती पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी एक वाजता पोहचेल. त्यानंतर एक ते आठ नोव्हेंबर दरम्यान दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी पंढरपूर येथून सुटेल आणि सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी लातूर येथे दाखल होईल.

COMMENTS