Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक

क्रिप्टोकरन्सीवर अधिक परतावा देण्याचे आमिष

अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवाशातील तिघांना क्रिप्टोकरन्सीमध्ये अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल 35 लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार

ऑनलाइन औषध खरेदी करताना फसवणूक
मयताच्या वारसाला न विचारता जमिनीची बेकायदा विक्री
डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाला एक कोटींचा गंडा

अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवाशातील तिघांना क्रिप्टोकरन्सीमध्ये अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल 35 लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एकाने नेवासा तालुक्यातील तिघांची सुमारे 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बापू दशरथ लांडगे (वय 23) धंदा-शेती रा. बकुपिंपळगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी माझे मित्र सुरेश यशवंत जाधव, अजय दामोदर साबळे व सोमनाथ कचरु वरकड असे आम्ही सर्वांनी मिळून माणिक शेषराव राठोड रा. मांडखेल तांडा मंदखेल ता. परळी (जि. बीड) याचे आयसीआयसीआय बँक खाते व फोन पे क्रमांकावर सदरचा मोबाईल क्रमांक हा त्याची पत्नी शिलू गिन्यानदेव आडे (शिलू माणि राठोड) हिच्या बँक खात्याला जोडण्यात आलेलैया मोबाईल क्रमांकावर आम्ही सर्वांनी मिळून 34 लाख 98 हजार 833 रुपये क्रिप्टोकरन्सीच्या नावाने सदरच्या खात्यावर व फोन पे क्रमांकावर पाठवून पाठविले. या रकमेवर त्यांनी कोणताही परतावा दिला नाही. व त्याने सांगितल्याप्रमाणे कोणतेही पैसे आम्हाला दिलेले नाही. आम्ही वारंवार त्याला फोन करुन आमचे पैशाबाबत विचारणा केली. परंतु तो आम्हाला तुमचे पैसे आज देतो उद्या देतो असे म्हणून आमचे पैसे देण्यास टाळाटाळ करुन आमचे सर्वांची वरीलप्रमाणे रक्कम स्विकारुन आमची फसवणूक करुन विश्‍वासघात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS