सातारा / प्रतिनिधी : कोरोना व ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
सातारा / प्रतिनिधी : कोरोना व ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात 884 नागरिक परदेशातून आले. त्यामधील 606 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. परदेशातून आलेल्या 33 जणांचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत परदेशातून आलेल्यांपैकी सहाजण कोरोनाबाधित, तर सहाजण ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत.
सातारा जिल्ह्यात विविध देशांतून आलेल्या परदेशी नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवत आहे. त्यामधील 851 नागरिकांची नोंद आढळली आहे. मात्र, 33 प्रवाशांचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. परदेशातून आलेल्यांपैकी फलटणमधील चौघांना कोरोना, तर पाचजणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. खंडाळा येथील एकजण कोरोना बाधित आढळला आहे.
न्यूयॉर्क येथून सातारा येथे आलेली युवती कोरोना बाधित आढळली होती. त्यानंतर ती ओमिक्रॉन बाधित असल्याचा अहवाल आल्याने सातारकरांची धास्ती वाढली. ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावापासून खबरदारी घेण्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क केला जात आहे. आरोग्य विभाग आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी बोलताना सांगितले.
COMMENTS