Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य विभागाचा 3200 कोटींचा घोटाळा ?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

मुंबई ः राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात स्वच्छतेच्या नावाखाली सुमारे 3200 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभ

शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली
पक्ष फोडला आता कंत्राटी भरतीचे पाप करू नका
पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूची नियुक्ती रद्द करा

मुंबई ः राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात स्वच्छतेच्या नावाखाली सुमारे 3200 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी आरोग्य विभागाचे स्वच्छतेचे टेंडर तातडीने रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, राज्यात घोटाळ्यांची मालिका थांबत नाहीत. प्रत्येक मंत्री जाता-जाता तिजोरी लुटून खाण्याच्या तयारीत आहे. अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेली महायुती पुन्हा सत्तेत येणार नाही हे माहित असल्याने फक्त सरकारी तिजोरी साफ करण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार यापूर्वी देखील आम्ही चव्हाट्यावर आणला आहे. परंतु तरी देखील या विभागाच्या मंत्र्यांची भूख काही कमी होताना दिसत नाही. स्वच्छतेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात 3200 कोटींचा घोटाळा झाला. तिजोरी स्वच्छ करण्याचा सरकारचा हा इरादा आता उघड आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

त्यामुळे यातील मलीदा त्यांच्यापर्यंत जातो की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाचे स्वच्छतेचं टेंडर तातडीने रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्याची गरज आहे. वडेट्टीवार म्हणाले की, 21 एप्रिल 2022 रोजी स्वच्छता टेंडरच्या प्रक्रीयेसाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती. राज्यातील 8 सर्कलमध्ये 27 हजार 869 बेडना प्रशासकीय मान्यता घेऊन स्वच्छतेच्या घोटाळ्याला सुरूवात केली गेली. पूर्वी ही प्रशासकीय मान्यता केवळ 77 कोटी 55 लाख 18 हजार रूपयांची होती. सत्ताधारी पक्षाच्या संबंधित लोकांनी हा उद्योग हातात घेतला आणि ही मान्यता 638 कोटींनी 18 सप्टेंबर 2023 रोजी वाढ करून घेतली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, इतर सामान्य आरोग्य केंद्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला. यासाठी 2022 च्या प्र.मा. मध्ये अंतर्गत क्लिनींग 30 रूपये बाह्य क्लिनींग 3 रूपये असा दर निश्‍चित करण्यात आला होता. सफाई मशीन, कामगार पगार देणे असा हा खर्च दाखविण्यात आला होता. नवीन प्र.मा. 2023 मध्ये अंतर्गत रेट 84 रूपये बाह्य रेट 9 रूपये 40 पेसे असा जाणून बुजून वाढविण्यात आला. ही वाढ 77 कोटीवरून 638 कोटी अशी दहापटीने करण्यात आली. हे टेंडर तीन वर्षांचे असून यामध्ये 2 वर्षानी वाढ करण्यात येण्याची तरतूद आहे. हा सरकारी तिजोरीवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

तिजोरी साफ करण्याचा एककलमी कार्यक्रम – आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवत वडेट्टीवारांनी म्हटले आहे की, राज्यात सध्या केवळ सरकारी तिजोरी साफ करण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार यापूर्वी देखील आम्ही चव्हाट्यावर आणला आहे. आता स्वच्छतेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात 3,200 कोटींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे हे स्वच्छतेचे टेंडर तातडीने रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी.

COMMENTS