Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाच्या 32 कोटींचा गैरवापर होऊ देणार नाही

खा. विखेंचा शिवसेना-राष्ट्रवादीसह स्वपक्षीयांचा सूचक इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी ः महापालिकेच्या नया पैशाचाही चुकीचा वापर होत असेल तर तो मी होऊ देणार नाही. दफनभूमी व स्मशानभूमीसाठी 32 कोटींची खासगी जमीन घेण्

अहिल्यादेवींच्या नावाला नव्हे, तर बाहेरच्या हस्तक्षेपाला विरोध
मताच्या लाचारीसाठी विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही – खासदार डॉ.सुजय विखे
नवमतदारांनी केले खासदार डॉ.सुजय विखे स्वागत

अहमदनगर/प्रतिनिधी ः महापालिकेच्या नया पैशाचाही चुकीचा वापर होत असेल तर तो मी होऊ देणार नाही. दफनभूमी व स्मशानभूमीसाठी 32 कोटींची खासगी जमीन घेण्याचा ठराव मनपा महासभेने केला असला तरी शहरातील मूलभूत प्रश्‍न संपल्यानंतर पैसे शिल्लक राहिले तर ते भूसंपादन करा, अशी माझी भूमिका आहे, असे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. दरम्यान, मनपात गाजत असलेल्या 32 खोके-एकदम ओके या विषयाच्या अनुषंगाने खा. विखेंनी स्पष्ट भूमिका मांडून मनपातील सत्ताधारी ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी व स्वतःच्या भाजप पक्षाच्या या जमीन खरेदी विषयाशी संबंधित पदाधिकारी व नगरसेवकांना सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.

महासभेत 32 कोटीत जमीन खरेदीचा ठराव झाला असला तरी त्याचे पैसे कोणीही आता देणार नाही. प्राधान्याने शहरातील मूलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी हे पैसे वापरले जावेत व प्रश्‍न सोडवल्यावर पैसे शिल्लक राहिले तर मग संबंधित भूसंपादनासाठी पैसे वापरावेत, असे स्पष्ट करून खा. विखे म्हणाले, मनपाची महासभा सर्वोच्च आहे. तिने घेतलेल्या निर्णयावर खासदार म्हणून मी टीकाटिपण्णी करणे योग्य नाही. पण शहराचे मूलभूत प्रश्‍न आधी सोडवले जावेत, असे माझे म्हणणे आहे, असे त्यांनी सांगितले.

32 कोटीच्या खासगी जमीन खरेदीची पुरेशी माहिती मला नाही. पक्षानेही मला सांगितली नाही व मीही पक्षाला विचारायला गेलो नाही. त्यामुळे त्याची सखोल माहिती घेतो, पण मनपाच्या एक नया पैशांचाही चुकीचा वापर मी होऊ देणार नाही, असा शब्द देतो. शहरातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठीच्या पैशांचा गैरवापर होत असेल तर तो मी होऊ देणार नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. मनपातील आमचे (भाजप) सर्व नगरसेवक स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. पण त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर तो मी निश्‍चितपणे थांबवेल, असे स्पष्ट करून ते म्हणाले, त्या ठरावाची अंमलबजावणी झाली व पैसे दिले गेले तरच पक्षावर बदनामीचे शिंतोडे उडतील. मी पक्षाचा नगरचा खासदार आहे व माझीही नगर शहराबद्दल काही जबाबदारी आहे. त्यामुळे जोपर्यंत नगर शहर खड्डे व धुळमुक्त होत नाही, तोपर्यंत हे पैसे मी इतर कामांसाठी वापरू देणार नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

आमचे सर्वच मुकुटमणी – आमच्या (भाजप) सर्व 16 नगरसेवकांकडे संघटन कौशल्य खूप असल्याने कोणाच्या डोक्यात विरोधी पक्ष नेत्याचा मुकुट घालावा, असा प्रश्‍न आहे. पाच पांडवांसारखे हे सारे आहेत, त्यांच्यातील अर्जुनाला मी शोधत आहे. सर्वांचे कौशल्य इतके आहे की, कोणाला न्याय द्यावा, असा प्रश्‍न आहे. पण मनपात विरोधी पक्ष नेतेपद मिळत नाही म्हणून आमच्या 16 नगरसेवकांपैकी कोणातही नाराजी नाही वा भांडणही नाही, कोणालाही पदाची अपेक्षा वा लालसा नाही. ते सर्वजण फक्त शहर विकासासाठी कटीबद्ध आहेत, अशी उपरोधिक प्रतिक्रिया खा. डॉ. विखेंनी व्यक्त केली. दरम्यान, मनपातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे 7 नगरसेवक असून, भाजपचे 16जण आमच्यासमवेत ठेवा. आमच्यात विरोधी पक्षाचे गुण आहेत, त्यामुळे आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिल्यास या पदावर नगरसेवक सुभाष लोंढे यांची निवड आम्ही करू, असे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी यावेळी सुचवल्यावर, तुम्ही तसा प्रस्ताव द्या, पालकमंत्र्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ, असे सूचक भाष्यही खा. डॉ. विखे यांनी केले.

COMMENTS