Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेची 3 हजार कोटी पाणीपट्टी थकली

मुंबई : मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक असून देखील महापालिकेतील खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प, नागरी सेवा-स

मिहीर शहाविरोधात लूक आऊट नोटीस
फास्ट टॅग स्कॅन होण्यास अडचण; आनेवाडी टोलनाक्यावर वाहनचालकास मारहाण
उध्दव ठाकरे : पुरोगामी गुण चिकटलेला नेता !

मुंबई : मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक असून देखील महापालिकेतील खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प, नागरी सेवा-सुविधा, मुंबई सुशोभिकरण प्रकल्प, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आदी विविध कामांमुळे मुंबई महानगरपालिकेचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच वेळी उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर आटला आहे. त्यातच आता आणखी एक उत्पन्नाचा स्रोत असलेल्या पाणीपट्टीची थकबाकी तब्बल 3 हजार 320 कोटींवर पोहोचल्याचे उघडकीस आले आहे.
खासगी सोसायट्यांपाठोपाठ मध्य आणि पश्‍चिम रेल्वेने 534 कोटी 30 लाख रुपये पाणीपट्टी थकविली आहे. त्याचबरोबर महापालिकेची पाणीपट्टी थकविणार्‍यांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट आदींचाही समावेश आहे. पाणीपट्टीची थकबाकी वाढू लागल्यामुळे भविष्यात जलविषयक कामांवर परिणाम होण्याची चिंता जल अभियंता विभागाला भेडसावू लागली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा 59,954 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात सादर झाला. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान 10.50 टक्क्यांनी अधिक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पात 33,290.03 कोटी रुपये महसुली उत्पन्न प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र अंदाज घेऊन ते 31,897.68 कोटी रुपये असे सुधारित करण्यात आले. परंतु आतापर्यंत पालिकेला केवळ 19,231.55 कोटी महसुली उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करापोटी आतापर्यंत केवळ 605.15 कोटी रुपये वसूल करता आले आहेत. चालू वर्षात मालमत्ता करापोटी मिळणार्‍या सुधारित 4,500 कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दीष्ट्य गाठणेही पालिकेसाठी अवघड बनले आहे.

COMMENTS