नवी दिल्ली : नवी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार झाला होता. या पिडीतेचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्य
नवी दिल्ली : नवी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार झाला होता. या पिडीतेचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर अशा पिडीतांसाठी ‘निर्भया निधी’ उभारण्यात आला होता. परंतु, 6 हजार कोटी रुपयांच्या निधीपैकी 30 टक्के निधी वापरण्यात आलाच नसल्याची माहिती पुढे आली.
याबाबत एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, निर्भया निधीच्या स्थापनेपासून 2021-22 पर्यंत, निधी अंतर्गत एकूण वाटप 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या निधी त्यापैकी 4 हजार 200 कोटी रुपये वापरण्यात आले आहेत, तर सुमारे 30 टक्के निधी विनावापर पडून आहे.निर्भया बलात्कार प्रकरणाला 10 वर्ष उलटली आहेत. तरीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी 23 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली होती. ही घटना निर्भया प्रकरण म्हणून ओळखले जाते. पिडीत विद्यार्थिनी निर्भया सिनेमा पाहून झाल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय इतर सहा जण होते. त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. याला विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला मारहाण केली आणि बेशुद्धावस्थेत बसमधून खाली फेकले. यानंतर बसमध्ये 6 नराधमांनी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता.
COMMENTS