Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू

परभणी ः समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन डॉक्टर तरुणींचा समावेश आ

बुलढाण्यात पुन्हा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
६८ व्या मजल्यावरुन खाली पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू
  दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं  

परभणी ः समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन डॉक्टर तरुणींचा समावेश आहे. हा अपघात वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात शनिवारी रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून तिंघाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.  डॉक्टर ज्योती क्षीरसागर, फाल्गुनी सुरवाडे आणि भरत क्षीरसागर, अशी मृतकांची नाव आहे. समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने जात असताना भरधाव कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात इतका भीषण होता की, कारमधील तिघांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. समृद्धी महामार्ग वाहनांसाठी ब्लॅक स्पॉट ठरत चालले आहे. मागील काही दिवसांत समृद्धी महामार्गावर अनेक वाहनांना अपघात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशा अनेक निष्पात लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

COMMENTS