Homeताज्या बातम्यादेश

काश्मीरमध्ये कर्नलसह 3 जवानांना वीरमरण

श्रीनगर/वृत्तसंस्था ः जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया सुरूच असून,  राजौरी आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये

राज्यात निरोध टंचाई, एड्स नियंत्रण मोहिमेला गतिरोधक
महिलांचा आदर करणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे – प्रणिती शिंदे
स्थानिक गुन्हे शाखा हवीय…आधी गुन्हेशोध लेखी परीक्षा द्या

श्रीनगर/वृत्तसंस्था ः जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया सुरूच असून,  राजौरी आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. बुधवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये कर्नल मनप्रीत सिंग यांच्यासह 3 जवान शहीद झाले आहे.
राजौरीमध्ये सोमवारपासून चकमक सुरू आहे. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यात एक जवान आणि एक एसपीओ शहीद झाला आहे. या कारवाईत लष्कराच्या एका श्‍वानाचाही मृत्यू झाला आहे. त्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या हँडलरचा जीव वाचवला. अनंतनाग जिल्ह्यातील चकमकीत शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांचे छायाचित्र आहे. राजौरी आणि अनंतनाग चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या तीन झाली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील चकमकीत शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांचे छायाचित्र आहे. राजौरी आणि अनंतनाग चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या तीन झाली आहे. या चकमकीत शहीद झालेल्या लष्कराच्या श्‍वानाचे नाव केंट असल्याचे लष्करी अधिकार्‍याने सांगितले. चकमकीदरम्यान त्याने आपल्या हँडलरला वाचवले आणि तो शहीद झाला. पळून जाणार्‍या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ते सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत असताना हा अपघात झाला. यावेळी त्यांच्यावर जोरदार गोळीबार झाला होता. एडीजी मुकेश सिंह यांनी सांगितले की, खराब हवामान असूनही, सुरक्षा दलांनी राजौरी शहरापासून 75 किमी अंतरावर असलेल्या भागाला रात्रभर वेढा घातला आणि सकाळी आसपासच्या भागात शोध तीव्र केला.

COMMENTS