Homeताज्या बातम्यादेश

जी-20 परिषदेसाठी राजधानीत 3 दिवस लॉकडाऊन

सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये राहणार बंद

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः जी-20 युरोपीयन युनियनसह 20 देशांची संघटना असून, या 20 देशांच्या प्रमुखांची शिखर परिषद राजधानी दिल्लीत होत असून, या परिषदेच

नववर्षानिमित्ताने घरकुल दिव्यांग मुलींना फराळ व कपड्याचे वाटप 
अखेर राजद्रोहाचे कलम स्थगित
गोवरचा विळखा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः जी-20 युरोपीयन युनियनसह 20 देशांची संघटना असून, या 20 देशांच्या प्रमुखांची शिखर परिषद राजधानी दिल्लीत होत असून, या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. या शिखर परिषदेसाठी राजधानी सज्ज झाली आहे. जी-20 समूहाची शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिषदेला जी 20 देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेदरम्यान, सरकारने सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांना 8,9 आणि 10 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची देशाला मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.
जी-20 युरोपीयन युनियनसह 20 देशांची संघटना आहे. या 20 देशांच्या प्रमुखांची वार्षिक बैठक होते. जी-20 परिषदेला समीट शिखर परिषद म्हणूनही ओळखली जाते. या परिषदेत मुख्य दहशतवाद, आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर देण्यात येतो. जी-20 समूह परिषदेत जगभरातील 20 देशांचा सामावेश होतो. जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेत या देशांचा 80 टक्के वाटा आहे. जी20 समूहात अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान, मेक्सिको, कॅनाडा, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम, चीन, जर्मनी, फ्रान्स रूस, अमेरिका आणि युरोपीय संघाचा समावेश आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बाइडन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि सऊदी अरबचे राजा सलमान बिन अब्दुलअजीज अल सऊद यांच्यासह आमंत्रित देशाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सरकारद्वारे राजधानी दिल्लीत सुटी जाहीर केली आहे. 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत सरकारी कार्यालये, शाळा, बँका बंद राहतील. तसेच खासगी कार्यालय देखील बंद राहणार आहे. सर्वोच्च न्यायालय, मेट्रो स्टेशन यावेळी बंद राहणार आहे.

COMMENTS