Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय आनंद महावीर युवक मंडळाचा आज 28 वा महाप्रसाद सोहळा

अहमदनगर प्रतिनिधी - अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. प.पू.श्री आनंदऋषीजींच्या स्मृतीदिनी गोरगरिबांसह सर्वधर्मीय भाविकांकरिता महाप्रस

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलिस स्टेशन हद्दीतील गावात घरा-घरात गणपती
नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप l DAINIK LOKMNTHAN
दुचाकीस्वाराला जखमी करून पळून जाणाऱ्या पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर प्रतिनिधी – अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. प.पू.श्री आनंदऋषीजींच्या स्मृतीदिनी गोरगरिबांसह सर्वधर्मीय भाविकांकरिता महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्याची परंपराच जय आनंद महावीर युवक मंडळाने निर्माण करण्याची कामगिरी बजावली आहे. प्रतीवर्षी 28 मार्चला महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करणारे हे मंडळ यावर्षी 28 मार्च 2023 ला महाप्रसाद सेवेचे 28 वे वर्ष साजरे करते आहे. मंडळाचा हा 28 मार्चचा 28 वा महाप्रसाद सोहळा सर्वांसाठीच कौतुकाचा विषय ठरला आहे. या महाप्रसाद सोहळ्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून स्वयंस्फूर्तीने भाविकांचे हात पुढे येण्याचे प्रमाण प्रतीवर्षी वाढत चालले आहे, हे मंडळाच्या पारदर्शी कार्याचे प्रतिकच म्हणावे लागेल.  
राष्ट्रसंत आचार्यसम्राट प.पू. श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या दिव्य सान्निध्याचा परमानंद लाभलेले युवक श्री अभय लोढा, नितीन मुनोत व श्री.संतोष बोकरिया यांनी जय आनंद युवक मंडळासमोर दि.28 मार्चला अन्नदान करण्याचा प्रस्ताव 28 वर्षांपूर्वी मांडला होता. मार्केट यार्डमधील व्यापारी मित्र मंडळ धार्मिक परीक्षा बोर्डच्या प्रांगणात 28 मार्चला भाविकांना अन्नदान करते त्याप्रमाणे शहराच्या मध्यवस्तीत 28 मार्चला अन्नदान सेवा करावी, असा हा प्रस्ताव होता. त्यानुसार नवीपेठमधील जय आनंद युवक मंडळाने सलग पाच वर्षे अन्नदान सेवा केली. पुढे जय आनंद युवक मंडळ व महावीर युवक मंडळ ही दोन मंडळे एकत्र येऊन जय आनंद महावीर युवक मंडळ उभे राहिले. या मंडळाचे अध्यक्षपद शैलेश मुनोत यांच्याकडे एकदिलाने आले. दि.28 मार्चची महाप्रसाद सेवा मंडळाकडून पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. नव्या दमाने व उत्साहाने महाप्रसाद सोहळा दि.28 मार्चला संपन्न होत राहिला. सुरूवातीला भारतीय बैठकीप्रमाणे पंगती करत महाप्रसाद वाटप व्हायचे. वयोवृध्दांची मांडी घालून खाली बसण्याची अडचण लक्षात घेऊन मंडळाने अलिकडे टेबल-खुर्च्यांची सुविधा उपलब्ध करून दिली. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी आनंद मुथा यांच्या खांद्याला खांदा लावून मंडळाचे कार्यकर्ते सर्वश्री बाबालाल गांधी, प्रमोद (पिटू) गांधी, मनोज गुंदेचा, सत्येन मुथा, ललित बनभेरू, प्रकाश गांधी, कुंतीलाल राका, धरमचंद भंडारी, संतोष कासवा, राहुल सावदेकर, विनोद भंडारी, योगेश मुनोत, सुरेश गांधी, हेमंत मुथा, अमित गांधी, शरद मुथा, सचिन कोठारी, चेतन गुगळे, अभय बोरा, राजेश (बाळू) चंगेडिया, अजय गांधी, अजित गांधी, मनोज चव्हाण, मनोज बोरा, मनिष गुगळे व स्व.गणेश गुंदेचा हे सर्वजण महाप्रसाद सोहळ्याकरिता अथक परिश्रम घेत राहिले. महाप्रसाद तयार करण्यासाठी सुरूवातीस आचारी स्व.रामू खंडेलवाल यांनी व पुढे गोपाल महाराज, पवन खंडेलवाल यांचे सहकार्य मंडळास आजतागायत मिळत राहिले. पहिल्या वर्षी केलेला पुरी-भाजी-बुंदी व मसालाभात हा मेनू आज 28 व्या वर्षीही तोच असून चवही तीच टिकवून ठेवण्याची काळजी आचारी मंडळी घेत आहेत, हे विशेष! महाप्रसादासाठी मदतीचे हात देणारे देणगीदारांना गावरान तुपातील स्वादिष्ट लाडूंचा प्रसाद घरपोहोच करण्याची दक्षता मंडळ घेते. आधुनिक कुरिअरचे विजय मुथा हे लाडू घरपोहोच करण्याची सेवा श्रध्देने गेली 28 वर्षे करत आले आहेत. महाप्रसाद सोहळ्यास मदतीचा हात देण्याकरिता स्व.सुवालालजी गुंदेचा, स्व.आ.अनिलभैय्या राठोड, स्व.खा.दिलीपजी गांधी हे सतत अग्रेसर असायचे. अलिकडे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्री.हस्तीमलजी मुनोत व उद्योगपती नरेंद्रजी फिरोदिया यांचा महाप्रसादासाठी मोठा हातभार लाभतो आहे. मंडळाने महिलांनाही आपल्या कार्यात सहभागी करून घेतल्याने त्यांनीही मंडळाचे कार्य पुढे नेण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते. न थकता वा कोणतीही सबब न सांगता महिला मंडळाचे कार्य आपलेपणाने आणि उत्साहाने करत आहेत. प.पू.श्रीआनंदऋषीजींच्या शिकवणुकीप्रमाणे आपले स्वतःचे आचरण राहिल याची दक्षता घेत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सार्वजनिक, धार्मिक अन् राष्ट्रीय कार्य जोमाने करण्याकरिता जय आनंद महावीर युवक मंडळाच्या माध्यमामधून हातात हात घालून एकदिलाने उभे ठाकलेले कार्यकर्ते आणि महिला हेच या मंडळाचे वेगळेपण होय. मात्र आनंद महावीर युवक मंडळ वेगळेपणाचा ठसा उमटवत वर्षभर कार्यरत रहाणारे मंडळ आहे. या मंडळाच्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकारींपर्यत सर्वजण निर्व्यसनी, शुध्द शाकाहारी, प्रसिध्दीचा हव्यास नसलेले आहेत. पदरमोड करत मंडळाच्या उपक्रमात योगदान देण्याकरिता सतत अग्रेसर रहातात हे विशेष! या मंडळाच्या स्थापनेपासून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा परिक्षक आणि पत्रकार या नात्याने मला जय आनंद महावीर युवक मंडळाच्या कार्यात आपलेपणाने सहभागी करून घेतले जात असल्याने मंडळाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच केला. आपल्या राष्ट्रसंतांविषयी अभिमान, आदर बाळगत श्रध्देने त्यांची स्मृती कशी जपावी? याचे गूज दि.28 मार्चच्या माध्यमामधून हे मंडळ सर्वांना सांगते.  नगर शहरातील नवीपेठ ऐतिहासिक पाऊलखुणा अभिमानाने जपत आली. ब्रिटीश काळात पोटींजरपुरा, निजामशाहीत सरकारवाडा रोड, शिवकाळात घोड्यांची पागा होती. येथील चौकात घोड्यांना पाणी पिण्यासाठी दगडी मजबूत बांधणीचा उभारलेला देखणा हौद शिवकालाची स्मृती जपत अनेकवर्षे घोड्यांसह भटक्या जनावरांची तहान भागवत राहिला. आजही या भागातील जुन्या वाड्यांमध्ये घोडे बांधणीच्या लोखंडी गोलाकार कड्या भिंतीमध्ये नेटकेपणाने बसवलेल्या पहावयास मिळतात. नानासाहेब पेशव्यांनी व्यापारी मंडळींना प्रोत्साहन देण्याकरिता वसवलेली नवीन वसाहत ती नवीन पेठ पुढे नवीपेठ या नावाने ओळखली जावू लागली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नवनवीन नावे धारण करणारी ही नवीपेठ सर्वपरिचित आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेली ही नवीपेठ राष्ट्रभक्तिचा प्रेरणादायी इतिहास जागवत नवतीचा नवेपणा सांभाळते आहे. याच नवीपेठमधील जय आनंद महावीर युवक मंडळ सातत्याने नव-नवे उपक्रम राबवून नवीपेठचे नाव सार्थ ठरवत आहे.
मिलिंद चवंडके

अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. प.पू.श्री आनंदऋषीजींच्या स्मृतीदिनी गोरगरिबांसह सर्वधर्मीय भाविकांकरिता महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्याची परंपराच जय आनंद महावीर युवक मंडळाने निर्माण करण्याची कामगिरी बजावली आहे. प्रतीवर्षी 28 मार्चला महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करणारे हे मंडळ यावर्षी 28 मार्च 2023 ला महाप्रसाद सेवेचे 28 वे वर्ष साजरे करते आहे. मंडळाचा हा 28 मार्चचा 28 वा महाप्रसाद सोहळा सर्वांसाठीच कौतुकाचा विषय ठरला आहे. या महाप्रसाद सोहळ्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून स्वयंस्फूर्तीने भाविकांचे हात पुढे येण्याचे प्रमाण प्रतीवर्षी वाढत चालले आहे, हे मंडळाच्या पारदर्शी कार्याचे प्रतिकच म्हणावे लागेल.  

COMMENTS