Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोफत रोगनिदान शिबिरात 280 रुग्णांची तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी ः ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित सर्व रोग निदान शिबिराचे उदघाटन शिर्डी

सर्वसामान्यांची प्रामाणिक सेवा हेच पुढील उद्दिष्ट : प्रभावती घोगरे
अहमदनगर शहर दहशतमुक्त करण्याचा महात्मा गांधी जयंतीदिनी संकल्प
मराठा आरक्षणासाठी कोपरगावात बेमुदत आमरण उपोषण सुरू

कोपरगाव प्रतिनिधी ः ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित सर्व रोग निदान शिबिराचे उदघाटन शिर्डी येथिल मानसोपचार तज्ज्ञ डॉ.ओंकार प्रबोध जोशी यांचे हस्ते एस.जे.एस.हास्पीटलचे संस्थापक चांगदेव कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ऐश्‍वर्या सातभाई, माजी उपनगराध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,डॉ.रविंद्र कुलकर्णी, डॉ.प्रिया जोशी, डॉ.अनिकेत कुलकर्णी, डॉ.शंतनु कुलकर्णी, एस.एस.बागडे यांच्या उपस्थित शनिवार 25 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.
या शिबिरांमध्ये रक्तदाब, शुगर, टु डीईको, ईसीजी, नेत्रविकार, फीजिओथिरेपी, त्वचाविकार आदी आजारांवर तपासणी करण्यात आली. तसेच गरजुनां मोफत औषधे देखील वितरीत करण्यात आली. या शिबिराचा लाभ 280 रुग्णांनी घेतला. तर प्रारंभी भगवान परशुराम यांचे प्रतिमा पूजन, दिपप्रज्वलन करुन शिबिराची सुरुवात करण्यात आली तर प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद कोर्‍हाळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयेश बडवे यांनी केले तसेच आभार संजीव देशपांडे यांनी मानले. या शिबिरातील संत जनार्दन स्वामी हास्पीटलच्या वैद्यकीय पथकांमध्ये डॉ. एफ.एस.बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सायली ठोंबरे, डॉ.प्रशांत सगळगिळे, डॉ.अनिरुध्द उबाळे, डॉ.साळवे,डॉ.गीता गिरमे,डॉ.बत्रा,डॉ.शंतनु कुलकर्णी,डॉ.सावनी येरनाळकर, विजय कडु यांचा समावेश होता. तर शिबिर यशस्वीतेसाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद, बी.डी.कुलकर्णी,सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे, खजिनदार जयेश बडवे,सहखजिनदार योगेश कुलकर्णी ,संघटक महेंद्र कुलकर्णी ,जेष्ठ सदस्य वसंतराव ठोबरे,संजीव देशपांडे, मिलिंद धारणगांवकर, अनिल कुलकर्णी, अ‍ॅड श्रध्दा जवाद, वंदना चिकटे, अजिंक्य पदे, सदाशिव धारणगांवकर आदिनी विशेष परीश्रम घेतले.

COMMENTS